जाहिरात

Tata Motors : सर्वात मोठा सायबर हल्ला; टाटा मोटर्सचं हजारो कोटींचं नुकसान, कर्मचाऱ्यांचा डेटाही उडाला

टाटा मोर्टसवर आतापर्यंतचा मोठा सायबर हल्ला झाला आहे. यामध्ये कंपनीला तब्बल 21 हजार कोटींचं नुकसान सहन करावं लागत आहे.

Tata Motors : सर्वात मोठा सायबर हल्ला; टाटा मोटर्सचं हजारो कोटींचं नुकसान, कर्मचाऱ्यांचा डेटाही उडाला

Tata Motors Share : टाटा मोर्टसवर आतापर्यंतचा मोठा सायबर हल्ला झाला आहे. यामध्ये कंपनीला तब्बल 21 हजार कोटींचं नुकसान सहन करावं लागत आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या सब्सिडियरी जॅग्युअर लँड रोव्हरवर सर्वात मोठा सायबर हल्ला झाला आहे. या सायबर हल्ल्यानंतर इंग्लंडलमध्ये जेएलआरच्या वेस्ट मिडलँड्स आणि मर्सिसाइड कारखान्यांमधील उत्पादन थांबवण्यात आलं आहे. त्यामुळे कंपनीला £2 बिलियन म्हणजे तब्बल 21 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. याचा थेट परिणाम टाटा मोटर्सच्या शेअरवर होत आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांमधील चिंता वाढली आहे.  

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जेएलआरच्या कम्प्युटर प्रमाणावर सायबर हल्ला झाला होता. हॅकर्सनी सिस्टीममध्ये घुसखोरी केली, ज्यामुळे कारखान्यातील काम मंदावलं. जेएलआर दररोज सुमारे एक हजार वाहनांचं उत्पादन करतो. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून उत्पादन थांबवण्यात आलं आहे. यातील सर्वात मोठी बाब म्हणजे कंपनीकडे सायबर विमा संरक्षण नाही. 

जेएलआर इन्शूरन्स घेण्याच्या प्रक्रियेत होता, मात्र त्यापूर्वीच हा हल्ला झाला. इंडस्ट्री द इंश्योररने हा खुलासा केला आहे. एप्रिल महिन्यात मार्क्स अँड स्पेंसरवरही असाच हल्ला जाला होता. मात्र त्यांच्याकडे इन्शूरन्स होता, ज्यामुळे नुकसान कमी झालं. मात्र जेएलआरला आता संपूर्ण नुकसान स्वत:चं सहन करावं लागणार आहे.  

Ladki Bahin e-KYC: 'लाडकी बहीण'साठी e-KYC करताना फसवणुकीचा धोका; कशी काळजी घ्याल?

नक्की वाचा - Ladki Bahin e-KYC: 'लाडकी बहीण'साठी e-KYC करताना फसवणुकीचा धोका; कशी काळजी घ्याल?

टाटा मोटर्सच्या एकत्रित उत्पन्नात जेएलआरचा वाटा 70% इतका आहे. परिणामी, जेएलआरला झालेल्या या धक्क्याचा थेट परिणाम टाटा मोटर्सच्या बॅलेन्स शीट आणि गुंतवणूकदारांवर होईल. हे कंपनीसाठी दुहेरी आव्हान आहे. एकीकडे, सायबर हल्ल्यामुळे उत्पादन विस्कळीत झाले आहे आणि दुसरीकडे, विमा संरक्षणाच्या अभावामुळे, संपूर्ण बिल त्यांना भरावे लागेल.

कर्मचाऱ्यांवर आणि डीलर्सवर थेट परिणाम

इंग्लंडमध्ये 33 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला आहे. अनेक डीलर्सकडे कार रजिस्ट्रेशनची सुविधाही नाही. याशिवाय स्पेयर पार्ट्स ऑर्डर करण्याचा पर्यायही नाही. याशिवाय डायग्नोस्टिक ऑफ्टवेअऱ काम करीत नाही. म्हणजे दुरुस्तीही अवघड आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या डेटावरही या हल्ल्याचा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com