Missing Army Man : पुण्यातील औंध भागातील रहिवासी आणि भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेसचे अधिकारी कॅप्टन शरीफसिंह भोसले यांच्यावर लष्कराने बडतर्फीची कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भोसले गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून बेपत्ता आहेत. त्यांना लष्कराने कारणे दाखवा नोटीस बजावली असून सेवा समाप्त का करू नये अशी विचारणा केली आहे. त्यामुळे कॅप्टन शरीफ सिंग भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
भोसले यांच्यानिमित्ताने डिसेंबर २०२५ चं आणखी एक प्रकरण चर्चेत आलं आहे. या प्रकरणातही ड्यूटीवर जात असताना सैन्याचा जवान शैलेश कुमार दुबे अचानक बेपत्ता झाला. मूळचा मध्यप्रदेशातील असलेला हा जवान सध्या कुठे आहे? तो बेपत्ता कसा झाला होता याबाबत जाणून घेऊया.
नक्की वाचा - Pune News: स्पेनमधून बेपत्ता झालेल्या कॅप्टन शरीफ भोसलेंवर होणार मोठी कारवाई
सैन्याचा जवान ड्यूटीवर येत असताना रहस्यमयरित्या बेपत्ता
डिसेंबर महिन्यातील १७ तारखेला मध्य प्रदेशातील सिंगरोली जिल्ह्यातील सैन्याचा जवान ड्यूटीवर येत असताना बेपत्ता झाला. जवान आपल्या घरातून ड्यूटी आणि पोस्टिंगवर तैनात होण्यासाठी वाराणसीहून दिल्ली रेजिमेंटसाठी निघाला होता. त्याचं पोस्टिंग मणिपूरला होता. विमानात दिलेलं त्याचं सामान दिल्लीला पोहोचलं, मात्र जवान फ्लाइटमध्ये नव्हता. याबाबत रेजिमेंटने सांगितलं होतं की, जवानाचं सामान फ्लाइटमधून मिळालं, मात्र जवान दिल्लीला पोहोचला नाही. जवानाचं मणिपूरमधील रेजिमेंटमधील पोस्टिंगचा रिपोर्टिंगची वेळ ठरविण्यात आली होती, मात्र तो आऊट ऑफ रीच झाला. त्यानंतर त्याच्याशी कुणाचाही संपर्क होऊ शकला नाही.
याबाबत कुटुंबाने सांगितलं की, ४ महार रेजिमेंट, मणिपूरसाठी रवाना झालेले बेपत्ता जवान शैलेश कुमार दुबे यांची पहिली फ्लाइट वाराणसीहून दिल्लीसाठी १५ डिसेंबरच्या सकाळी ७ वाजेची होती. मात्र ही फ्लाइट रद्द झाली होती. जवानांची दुसरी फ्लाइट सकाळी ९ वाजता दिल्लीला रवाना होणार होती. त्यानुसार फ्लाइट दिलेल्या वेळेत दिल्लीला पोहोचली, मात्र या विमानात जवान नव्हता. डिसेंबर १७ मध्ये बेपत्ता झालेले जवान शैलेश कुमार दुबे सापडल्याची बातमी मिळू शकलेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world