Jyoti Malhotra : युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या कथित प्रकरणाची सध्या कसून चौकशी सुरू आहे. तिच्या पर्सनल डायरीतून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. तर चौकशीतून देखील अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पाकिस्तान चीननंतर आता तिचे बांगलादेशशी असलेले संबंध समोर आले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
युट्यूबर ज्योती मल्होत्रावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आणि शत्रू राष्ट्राला गुप्त आणि धोरणात्मक माहिती शेअर केल्याचा आरोप आहे. ती अनेक पाकिस्तानी एजंट्सच्या संपर्कात असल्याचंही बोललं जात आहे. ज्यात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या काही एजन्ट्सचाही समावेश आहे.
आता नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार, ज्योती पाकिस्तान आणि चीननंतर बांगलादेशलाही जाण्याचा विचार करत होती. बांगलादेशला जाण्यासाठी तिने भरलेल्या अर्जावरून याची पुष्टी झाली आहे. या अर्जात तारीख नमूद केलेली नाही. अर्ज कधी भरला याची माहिती मिळत आहे. ज्या पद्धतीने ज्योतीने हा फॉर्म भरला होता, त्यावरून हे स्पष्ट होते की अलीकडेच ज्योती मल्होत्राने बांगलादेशला जाण्यासाठी अर्ज केला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरच हा फॉर्म भरला गेला असण्याची शक्यता आहे.
(पाकिस्तानच्या गुप्तहेरांचे धक्कादायक जबाब, 'असे' अडकले दानिशच्या जाळ्यात)
बांगलादेशातील सत्ता बदलानंतर ज्योतीने बांगलादेशला जाण्यासाठी केलेल्या अर्जावरून असे दिसून येते की तिच्या अनेक महत्त्वाच्या लोकांशी भेटी घेणार असेल. किंवा ती तिथे ट्रॅव्हल ब्लॉग बनवण्यासाठी जाणार असावी आहे. सत्य काय आहे ते पुढील तपासात समोर येईल?
(Pakistan Spy: ज्योती मल्होत्रा, 12 गुप्तहेर अन् 12 प्रश्न, पाकिस्तानने नेमकं कुणाला हेरलं?)
ISI अधिकाऱ्याच्या थेट संपर्कात
यूट्यूबर ज्योती मल्होत्रा ही एका ISI या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एका अधिकाऱ्याच्या थेट संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. तपास यंत्रणांच्या हाती लागलेलं एक चॅटमधून हा खुलासा झाला आहे. याशिवाय ज्योती मल्होत्राचा एक व्हिडिओही समोर आला होता. यामध्ये ती भारत-पाकिस्तान सीमेजवळील थार वाळवंटात राहणाऱ्या स्थानिक लोकांना भेटताना दिसत आहे. शिवाय, ती त्याच्या जीवनशैलीबद्दल देखील जाणून घेत आहे. एवढेच नाही तर व्हिडिओमध्ये असे दिसून येते की ज्योती या स्थानिक लोकांना पाकिस्तानशी संबंधित अनेक प्रकारचे प्रश्न विचारते.