Agnivesh Agarwal: देशातील दिग्गज उद्योगपतींच्या यादीत नावाचा समावेश असणारे वेदांता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांच्यासाठी वर्ष 2026ची सुरुवात अतिशय धक्कादायक ठरलीय. अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल (वय 49 वर्ष) यांच्या अचानक झालेल्या निधनाने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. सोशल मीडियावरही नेटकरी त्यांच्याप्रति सहवेदना व्यक्त करत आहेत. दरम्यान अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या निधनानंतर व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील सदस्यांसह त्यांच्या वारसदाराबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न लोक करताना दिसतायेत.
अनिल अग्रवाल कोण आहेत, त्यांच्या कुटुंबामध्ये कोणकोण आहे आणि त्यांनी इतकी मोठा व्यवसाय कसा उभारला. मुलाच्या मृत्यूनंतर त्यांचा व्यवसाय पुढे कोण नेणार? याबाबत माहिती जाणून घेऊया...
कोण आहेत अनिल अग्रवाल? | Who Is Anil Agarwal?
अनिल अग्रवाल हे Vedanta Resources चे संस्थापक आणि चेअरमन आहेत. त्यांनी वर्ष 1976 मध्ये एका छोट्या केबल कंपनीपासून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. अतिशय कमी वयात त्यांनी आपल्या वडिलांसोबत भंगार व्यवसायातून उद्योग जगतात पाऊल ठेवले. अनेक अपयशांचा सामना केल्यानंतरही त्यांनी कधीही हार मानली नाही आणि हळूहळू वेदांता समूहाची मेटल, मायनिंग, पॉवर आणि तेल यासारख्या मोठ्या क्षेत्रांत जागा निर्माण केली. सामान्य कुटुंबातून बाहेर पडून अब्जावधी किंमतीची कंपनी उभारणारे अनिल अग्रवाल यांची कहाणी सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी आहे.
अनिल अग्रवाल यांच्या कुटुंबात कोण कोण आहे? | Anil Agarwal Family Members
अनिल अग्रवाल यांचे कुटुंब साधेपणासाठी ओळखले जाते. त्यांच्या पत्नी किरण अग्रवाल या प्रसारमाध्यमांपासून दूर राहणं पसंत करतात, पण त्या या कुटुंबाचा भक्कम आधारस्तंभ आहेत. अग्निवेश अग्रवाल आणि प्रिया अग्रवाल अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. अलीकडेच अमेरिकेत उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने अग्निवेश अग्रवाल यांचे निधन झाले, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरलीय. मुलाच्या निधनानंतर अनिल अग्रवाल यांनी सांगितले की अग्निवेश हा केवळ त्यांचा मुलगा नव्हता तर जिवलग मित्र आणि त्यांचा तो अभिमान होता.
व्यवसाय विश्वामध्ये अग्निवेश अग्रवाल यांची स्वतंत्र ओळख
अग्निवेश अग्रवाल यांनी व्यवसाय विश्वामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी ‘Fujairah Gold' यासारखी कंपनी उभारली आणि ते हिंदुस्थान झिंक कंपनीचे (Hindustan Zinc) चेअरमनही होते. तसेच वेदांता ग्रुपच्या Talwandi Sabo Power Limited या कंपनीचे बोर्ड सदस्यांमध्येही त्यांचा समावेश होता.
प्रिया अग्रवाल यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारीThe untimely passing of Shri Agnivesh Agarwal is deeply shocking and saddening. The depth of your grief is evident in this touching tribute. Praying that you and your family find continued strength and courage. Om Shanti.@AnilAgarwal_Ved https://t.co/qn0DBuBj2S
— Narendra Modi (@narendramodi) January 8, 2026
अनिल अग्रवाल यांची मुलगी प्रिया अग्रवाल सध्या वेदांता आणि हिंदुस्थान झिंकच्या बोर्डमध्ये सहभागी आहेत. हिंदुस्थान झिंक कंपनीच्या चेअरपर्सन म्हणून मोठी जबाबदारी त्या सांभाळत आहेत. व्यवसायातील त्यांची पकड मजबूत मानली जाते आणि येत्या काळात वेदांताची सूत्रे त्यांच्या हाती येण्याची शक्यता आहे.
अनिल अग्रवाल यांची एकूण संपत्ती किती आहे?भंगार व्यापाऱ्यापासून आपल्या प्रवासाला सुरुवात करणारे अनिल अग्रवाल यांचा आज भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश आहे. फोर्ब्सच्या (Forbes) रिपोर्टनुसार, अनिल अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे 4.2 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 35,000 कोटी रुपये इतकी आहे.
वेदांता ही 2003 साली London Stock Exchange मध्ये सूचीबद्ध होणारी पहिली भारतीय कंपनी ठरली. यानंतर वर्ष 2019मध्ये अनिल अग्रवाल यांनी कंपनी पुन्हा खासगी (प्रायव्हेट) केली. मेटल, मायनिंग, पॉवर आणि तेल-गॅस यासारख्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेला वेदांता ग्रुप आज भारतासह परदेशातही विस्तारलेला आहे.
संपत्तीपैकी 75% दान करण्याचा संकल्पइतकी प्रचंड संपत्ती असूनही अनिल अग्रवाल आपल्या साधेपणा आणि दानशूर स्वभावासाठी ओळखले जातात. ‘Giving Pledge' अंतर्गत त्यांनी आपल्या संपत्तीपैकी 75 टक्के भाग समाजसेवेसाठी दान करण्याचे ठरवलंय. त्यांनी यापूर्वीच जाहीर केले होते की आपल्या कमाईचा 75 टक्के हिस्सा ते समाजहितासाठी वापरणार आहेत. मुलाच्या निधनानंतर त्यांनी सांगितले की आता ते अधिक साधे जीवन जगतील आणि अग्निवेशची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी समाजसेवेचे कार्य अधिक वेगाने पुढे नेतील.
(नक्की वाचा: PAN-Aadhaar Link: डेडलाइन संपली! तुमचे PAN Card इनअॅक्टिव्ह झालंय का? काही सेकंदांत असे तपासा स्टेटस)
आता स्वप्नांचा वारसा कोण सांभाळणार?
वयाच्या 49व्या वर्षी अग्निवेश अग्रवाल यांचे निधन होणे कुटुंबासाठी मोठे धक्का आहे. आता ते या जगात नसल्यामुळे अनिल अग्रवाल यांचे पूर्ण लक्ष आपली मुलगी प्रिया अग्रवाल यांच्यावर आणि त्यांच्यासोबत भारताला आत्मनिर्भर करण्याच्या ध्येयावर केंद्रित असणार आहे. येत्या काळात त्या ग्रुपची मोठी जबाबदारी सांभाळताना दिसू शकतात. अनिल अग्रवाल यांनी सांगितले की अग्निवेशचे स्वप्न होते की देशातील कोणताही व्यक्ती उपाशी झोपू नये आणि प्रत्येक तरुणाला रोजगार मिळावा. हाच संकल्प घेऊन आता अग्रवाल कुटुंब पुढे वाटचाल करणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world