जाहिरात

PAN-Aadhaar Link: डेडलाइन संपली! तुमचे PAN Card इनअ‍ॅक्टिव्ह झालंय का? काही सेकंदांत असे तपासा स्टेटस

PAN Card Status Check Online: तुमचे पॅनकार्ड सक्रिय आहे की निष्क्रिय? घरबसल्या काही सेकंदात जाणून घ्या माहिती... 

PAN-Aadhaar Link: डेडलाइन संपली! तुमचे PAN Card इनअ‍ॅक्टिव्ह झालंय का? काही सेकंदांत असे तपासा स्टेटस
"PAN-Aadhaar Linking Status: पॅनकार्ड अ‍ॅक्टिव्ह आहे की नाही?"
Canva

PAN Card Status Check Online: नवीन वर्ष सुरू होताच कोट्यवधी पॅन कार्डधारकांच्या मनात एकच प्रश्न आहे की, आपलं PAN कार्ड इनअ‍ॅक्टिव्ह तर झालेलं नाहीय ना? यामागचं कारणही स्पष्ट आहे. पॅन कार्ड - आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख (PAN–Aadhaar Linking Deadline) 31 डिसेंबर 2025 होती, ही मुदत आता संपलीय आणि सरकारडून मुदत वाढवण्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे ज्या लोकांनी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलं नाही, त्यांचं PAN कार्ड निष्क्रिय झाल्याची शक्यता आहे. जर तुम्हीही या यादीत असाल तर घाबरण्याची गरज नाही. पॅन कार्ड निष्क्रिय झालंय की नाही? याबाबतची माहिती तुम्ही घरबसरल्या अगदी काही मिनिटांत तपासू शकता.

31 डिसेंबर 2025च्या डेडलाइननंतर PAN स्टेटस तपासणे आवश्यक

आयकर विभागाच्या नियमांनुसार, जर PAN आणि Aadhaar कार्ड ठरलेल्या वेळेत लिंक झाले नाही तर PAN कार्ड निष्क्रिय होईल. म्हणजे यानंतर तुमचे PAN कार्ड आता दैनंदिन जीवनातील अनेक महत्त्वाच्या कामांसाठी वापरता येणार नाही. 31 डिसेंबरची तारीखही निघून गेलीय, सरकारकडून मुदत वाढवण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रत्येक PAN कार्ड धारकांनी त्यांचं पॅनकार्ड निष्क्रिय झालंय की नाही? हे तपासणं आवश्यक आहे. 

PAN Inactive झाल्यास कोणत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो? 

  • इनकम टॅक्स रीटर्न (ITR) फाइल करू शकणार नाही आणि टॅक्स रिफंडही मिळणार नाही.
  • बँक किंवा डीमॅट खाते उघडण्यात अडचणी येऊ शकतात. मोठ्या रकमांच्या वस्तू खरेदी करण्यासाठी PAN कार्ड वापरता येणार नाही.
  • डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित अनेक कामे रखडू शकतात.
  • बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये रोख रक्कम जमा करणे किंवा रक्कम काढणे कठीण होऊ शकते. 
  • पासपोर्ट काढणे किंवा सरकारी सबसिडी मिळवणे यासारख्या अनेक सरकारी सेवांमध्ये अडथळे येऊ शकतात.
  • इतकेच नव्हे तर तुमचे जुने PAN कार्ड हरवलं किंवा खराब झाले तर नवीन PAN काढणेही अवघड होईल, कारण त्यासाठी आधार क्रमांक देणे आवश्यक असते.

Fact Check : RBI मार्च महिन्यापासून ATMमधून 500 रुपयांच्या देणे बंद करणार? का? नेमके काय आहे सत्य

(नक्की वाचा: Fact Check : RBI मार्च महिन्यापासून ATMमधून 500 रुपयांच्या देणे बंद करणार? का? नेमके काय आहे सत्य)

PAN Active आहे की Inactive, हे कसे तपासावे?

PAN कार्डचं स्टेटस तपासणे अतिशय सोपे आहे आणि त्यासाठी घराबाहेर पडण्याची आवश्यकता नाही. तुमच्याकडे फक्त PAN नंबर आणि PAN कार्डशी जोडलेला तुमचा मोबाइल नंबर असणं गरजेचं आहे. 

  1. सर्वप्रथम आयकर विभागाच्या अधिकृत इ-फाइलिंग वेबसाइटवर incometaxindiaefiling.gov.in भेट द्या
  2. वेबसाइटच्या होम पेजवर Quick Links सेक्शनमध्ये Verify PAN Status हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  3. आता एक नवीन वेबपेज उघडेल, तेथे तुम्हाला PAN नंबर, नाव, जन्मतारीख आणि मोबाइल नंबर सबमिट करावा लागेल.
  4. PAN कार्डशी जोडलेला मोबाइल क्रमांक सबमिट करावा. 
  5. सर्व माहिती सबमिट केल्यानंतर Continue या पर्यायावर क्लिक करा.
  6. यानंतर तुमच्या मोबाइलवर एक OTP येईल. OTP सबमिट केल्यानंतर Validate पर्यायावर क्लिक करा.
  7. स्क्रीनवर तुमच्या PAN कार्डचं संपूर्ण स्टेटस (PAN Card Status) दिसेल. त्यामध्ये स्पष्टपणे PAN सक्रिय आहे की निष्क्रिय? याबाबतची माहिती स्पष्ट दिसेल. 

SIP investment: SIPच्या मदतीनं 10 वर्षात करोडपती कसे व्हाल? किती गुंतवणूक करावी? वाचा संपूर्ण कॅलक्युलेशन 

(नक्की वाचा: SIP investment: SIPच्या मदतीनं 10 वर्षात करोडपती कसे व्हाल? किती गुंतवणूक करावी? वाचा संपूर्ण कॅलक्युलेशन )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com