जाहिरात

VIDEO: मुलाची वाट पाहत बसलेल्या आईला कारने चिरडलं, लेकासमोरच जीव सोडला; थरकाप उडवणारी दृश्य

आग्रा येथील जगदीशपुरा पोलिस स्टेशन हद्दीतील मारुती इस्टेट चौकाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर ही घटना घडली. 60 वर्षीय मुन्नी देवी यांचा मुलगा बाईकमध्ये पेट्रोल भरत होता.

VIDEO: मुलाची वाट पाहत बसलेल्या आईला कारने चिरडलं, लेकासमोरच जीव सोडला; थरकाप उडवणारी दृश्य
Petrol Pump Video
  • आगरा के एक पेट्रोल पंप पर एक महिला को कार ने बेरहमी से कुचल दिया, महिला की मौके पर ही मौत हो गई.
  • महिला का बेटा बाइक में पेट्रोल भरवा रहा था जबकि महिला जमीन पर बैठकर बेटे का इंतजार कर रही थी.
  • ड्राइवर ने महिला को देखे बिना कार आगे बढ़ाई और उसे कार के नीचे रौंद दिया.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका पेट्रोल पंपावर गाडीखाली चिरडून एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, आरोपी कारचालकाचा शोध घेत आहेत.

आग्रा येथील जगदीशपुरा पोलिस स्टेशन हद्दीतील मारुती इस्टेट चौकाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर ही घटना घडली. 60 वर्षीय मुन्नी देवी यांचा मुलगा बाईकमध्ये पेट्रोल भरत होता. यावेळी मुन्नी देवी पेट्रोल पंपावर जमिनीवर बसून मुलाची वाट पाहत होत्या. त्यांच्या पाठीमागे एक कार उभी होती. अचानक या कारच्या चालकाने कोणतीही खबरदारी न घेता कार पुढे घेतली. ज्यामुळे मुन्नी देवी थेट कारखाली आल्या.

कारचालकाने महिलेला पाहिलेच नाही. क्षणार्धात गाडी तिच्या अंगावरून पुढे गेली आणि मुन्नी देवी गंभीर जखमी झाल्या. हा अपघात इतका भीषण होता की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचा आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

अशा घटनांवर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून भविष्यात असे जीव वाचवता येतील. कोणत्याही व्यक्तीचा जीव इतका स्वस्त नाही की, गाडीत बसलेला एखादा माणूस एका क्षणात त्याला चिरडून टाकेल. या घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षा आणि निष्काळजी वाहनचालकांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न निर्माण केला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com