जाहिरात

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेचा सर्वात पहिला Viral Video, कुणी आणि कुठे बनवला?

Ahmedabad Plane Crash Video : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर लगेचच 17 सेकंदांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेचा सर्वात पहिला Viral Video, कुणी आणि कुठे बनवला?
Ahmedabad Plane Crash: हा व्हिडिओ एका मुलाने बनवला होता. ग्राउंड रिपोर्टसाठी पोहोचलेल्या एनडीटीव्हीने त्या मुलाशी संवाद साधला.
मुंबई:

Ahmedabad Plane Crash Video : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI171 विमानाचा 12 जून रोजी अपघात झाला. या घटनेत किमान 274 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये मानात असलेले प्रवासी आणि क्रू मेंबर्स यांच्या व्यतिरिक्त जमिनीवरील स्थानिक रहिवाशांचाही समावेश आहे. घटनेचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, जे खूपच भयानक आहेत. हे व्हिडिओ पाहून घटनेची भीषणता किती होती, याचा अंदाज येऊ शकतो.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

क्रॅश झाल्यानंतर लगेच 17 सेकंदांचा Video Viral

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर लगेचच 17 सेकंदांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये आकाशात उडणारे विमान काही सेकंदांतच जमिनीवर कोसळताना दिसत आहे. त्यानंतर त्यातून आग आणि धुराचे लोट वर उठतात. हा व्हिडिओ एका मुलाने बनवला होता. ग्राउंड रिपोर्टसाठी पोहोचलेल्या एनडीटीव्हीने त्या मुलाशी संवाद साधला, तसेच ज्या ठिकाणाहून हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता, ते ठिकाणही पाहिले.

पोलिसांनी केली चौकशी

हा व्हिडिओ बनवणाऱ्या मुलाचे नाव आर्यन असल्याचे सांगितले जात आहे. विमान अपघात होण्यापूर्वी दोन तास आधीच तो आपल्या गावातून परतला होता. त्याने हा व्हिडिओ गावातील लोकांना दाखवण्यासाठी बनवला होता. आता हाच व्हिडिओ तपासाचा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. आर्यनची पोलिसांनीही चौकशी केली आहे. 

( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash: टाटा सन्सच्या प्रमुखांनी लिहिलं कर्मचाऱ्यांना भावुक पत्र, वाचा संपूर्ण मजकूर )
 

आर्यननं व्हिडिओ बनवल्यानंतर सर्वात आधी आपल्या वडिलांना पाठवला होता. आर्यनच्या शेजाऱ्याने सांगितले की विमानातून कोणताही आवाज येत नव्हता. आर्यन जिथे राहतो, ते घर अहमदाबाद विमानतळाला लागूनच आहे. व्हिडिओ बनवल्यानंतर तो खूप घाबरलेला आहे.

हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

काही सेकंदातच क्रॅश

गुरुवारी, AI 171 - बोइंग ड्रीमलाइनर 787-8 ने सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. उड्डाण केल्यानंतर काही सेकंदांतच विमान क्रॅश झाले.  ते आगीच्या ज्वाळांनी वेढण्यापूर्वी बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन कोसळले. अहमदाबादच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलने सांगितले की, पायलटने उड्डाण केल्यानंतर लगेचच 'मेडे' डिस्ट्रेस कॉल जारी केला होता, जो पूर्णपणे आपत्कालीन परिस्थिती असतानाच दिला जातो. 

( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash: मेडे, मेडे, मेडे...विमान कोसळण्यापूर्वी पायलटनं दिलेल्या सिग्नलचा अर्थ काय? )
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com