जाहिरात

Ahmedabad Plane Crash : ‘मेडे मेडे..’ म्हणण्यापूर्वी काय घडलं? Aviation Expert रोहित चंदावरकरांची महत्त्वपूर्ण माहिती

Aviation Expert Rohit Chandavarkar : रोहित चंदावरकर यांनी स्पष्ट केले की, “ही दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी विमान सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा होणे अत्यावश्यक आहे.

Ahmedabad Plane Crash : ‘मेडे मेडे..’ म्हणण्यापूर्वी काय घडलं? Aviation Expert रोहित चंदावरकरांची महत्त्वपूर्ण माहिती

अविनाश पवार, प्रतिनिधी

अहमदाबादमध्ये 12 जून 2026 रोजी झालेल्या एअर इंडियाच्या (Air India plane crash in Ahmedabad) विमान अपघाताबाबत भारतीय विमान दुर्घटना तपास ब्युरोने आपला प्राथमिक अहवाल प्रसिद्ध (AAIB initial probe report on Ahmedabad Air India crash) केला आहे. रिपोर्टमधील माहितीनुसार, अहमदाबाद विमान दुर्घटनेतील कॉकपीटमधील पायलटच्या संभाषणाचा ऑडिओ आता समोर आला आहे.

ज्यामुळे या भीषण दुर्घटनेच्या क्षणापूर्वी काय घडले, यावर काही प्रमाणात प्रकाश पडत आहे. ऑडिओमध्ये एका पायलटने दुसऱ्या पायलटला विचारले, “थ्रस्ट फायर बंद का केला?”, त्यावर दुसरा पायलट “मी बंद केला नाही.” असे उत्तर देतो. या संवादानंतर काही सेकंदातच “मेडे मेडे...” हा शेवटचा संदेश येतो आणि त्यानंतर विमानाचा ग्राउंड रडारशी संपर्क तुटतो .

तांत्रिक बिघाड नेमका काय असू शकतो?

या पार्श्वभूमीवर विमान हालचाली, यंत्रणा आणि सुरक्षिततेच्या बाबींच्या तांत्रिक बाजू स्पष्ट करण्यासाठी NDTV चे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी एव्हिएशन एक्स्पर्ट रोहित चंदावरकर (Aviation Expert Rohit Chandavarkar) यांच्याशी विशेष संवाद साधला. याबाबत रोहित चंदावरकर यांनी सांगितले की, “या संभाषणातून असं दिसतं की, पायलटला तांत्रिक बिघाडाची कल्पना आली होती. परंतु त्यांना परिस्थिती हाताळण्यासाठी अत्यंत मर्यादित वेळ मिळाला. ‘थ्रस्ट फायर' संबंधित समस्या ही विमानाच्या इंजिन किंवा फ्यूल सप्लाय सिस्टीमशी संबंधित असू शकते.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, इंजिन फेल्युअर, इंधन वितरण यंत्रणेत बिघाड, किंवा अचानक इलेक्ट्रिकल सिस्टिम फेल होणे, या तिन्ही गोष्टींमुळे विमानातील पॉवर लॉस होऊ शकतो. ज्यामुळे पायलेटला इंजिन कंट्रोलमध्ये आणण्यासाठी वेळ मिळाला नसावा.

Ahmedabad Plane Crash : टेकऑफच्या काही क्षणात दोन्ही इंजिन बंद; एअर इंडिया विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात धक्कादायक खुलासा

नक्की वाचा - Ahmedabad Plane Crash : टेकऑफच्या काही क्षणात दोन्ही इंजिन बंद; एअर इंडिया विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात धक्कादायक खुलासा


दुर्घटना का घडली?

  • या दुर्घटनेचा प्राथमिक अंदाज पुढीलप्रमाणे मांडता येईल:
  • टेकऑफनंतर काही मिनिटांतच इंजिन पॉवर लॉस होणे.
  • इंजिन कंट्रोल यंत्रणा पुन्हा सुरू करण्यासाठी पायलट्सनी प्रयत्न केले, परंतु ‘थ्रस्ट फायर' बंद झाला किंवा बंद झाल्याचा इंडिकेशन मिळाल्यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली.
  • विमान उंची गमावत गेले आणि शेवटी “मेडे मेडे” कॉल देण्यात आला.
  • संभाव्य इलेक्ट्रिकल फेल्युअरमुळे विमानाच्या कॉकपिट डिस्प्लेजवर चुकीचे सिग्नल मिळत असण्याची शक्यता.

विमान सुरक्षा व्यवस्थेत बदलाची गरज..

रोहित चंदावरकर यांनी स्पष्ट केले की, “ही दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी विमान सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा होणे अत्यावश्यक आहे. लहान विमानांमध्ये नियमित तांत्रिक तपासणी, पायलेटला तांत्रिक आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे नियमित प्रशिक्षण, तसेच एअर ट्रॅफिक कंट्रोलसह समन्वय मजबूत करणे आवश्यक आहे.”


राजकीय आणि धोरणात्मक पातळीवर प्रश्न

या दुर्घटनेनंतर सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत, मात्र यावरून मोठ्या घोषणा न होता खर्‍या अर्थाने सिस्टिम सुधारण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. DGCA च्या चौकशी अहवालातील निष्कर्ष किती पारदर्शकपणे सार्वजनिक केले जातील, तसेच यामुळे भविष्यातील उड्डाणे किती सुरक्षित बनतील, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


थोडक्यात निष्कर्ष:

  • ‘मेडे मेडे' कॉल अगोदर तांत्रिक बिघाडाची पायलट्सना कल्पना मिळाली होती.
  • इंजिन फेल्युअर किंवा फ्यूल सप्लाय सिस्टिममध्ये बिघाड प्राथमिक कारण असू शकते.
  • वेळेअभावी विमान नियंत्रित करता आले नाही.
  • विमान सुरक्षा प्रणालीत तातडीने सुधारणा आवश्यक.


अधिकृत चौकशीचा अहवाल येईपर्यंत या दुर्घटनेच्या कारणांवर अंतिम निष्कर्ष देणे शक्य नसले, तरी तज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार ही घटना केवळ अपघात नसून, तांत्रिक अपयश आणि व्यवस्थात्मक कमतरतेचे मिलाफ असू शकते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com