महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? दिल्लीत महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार हे नेते बैठकीला उपस्थित आहेत. 

Advertisement
Read Time: 2 mins

लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला राज्यात मोठा धक्का बसला आहे. भाजपला राज्यात लोकसभा निवडणुकीत 14 जागांचा फटका बसला आहे. त्यामुळे या पराभवाचं मंथन आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने भाजप पक्षश्रेष्ठींच्या नेतृत्वात महत्त्वाची बैठक दिल्लीत सुरु आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राहणार की नाही, याबाबत देखील चर्चा होणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राहणार की नाही याचा फैसला देखील आज होणार आहे. त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात कसे उमटणार याकडे देखील भाजपसह सर्वांचंच लक्ष आहे.

(नक्की वाचा- ओबीसीमधून आरक्षण नको; लक्ष्मण हाकेंच्या पाठिंब्यासाठी अख्खं गाव बसलं उपोषणाला)

बैठकीला कोण-कोण उपस्थित?

राज्यातून भाजपचे सात बडे नेते या बैठकीला उपस्थित आहेत. यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार या नेत्यांचा समावेश आहे. 

Advertisement

(नक्की वाचा- इंदापूरची जागा वाढवणार महायुतीची डोकेदुखी, पवार-फडणवीस कसा सोडवणार तिढा?)

कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार?

  • मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याचा शक्यता आहे. 
  • देवेंद्रफडणवीस यांना सरकारमधून मोकळे करायचे की नाही, यावर निर्णय होणार.
  • फडणवीसांना मुक्त केलं तर त्यांच्या जागी कुणाला संधी द्यायची, यावरही चर्चा होण्याची शक्यता. 
  • गिरीश महाजन आणि आशिष शेलार यांची नावे चर्चेत.
  • देवेंद्र फडणवीसांकडे काय जबाबदारी द्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता.
  • आमदारांबाबत लोकांमध्ये असलेली नाराजी, लोकसभा निवडणुकीतील अपयश यावरही चर्चा होणार.
  • विधानसभा निवडणुकीसाठीचे जागावाटप, मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा होणार.
  • मंत्रिमंडळ विस्तारात प्रस्थापितांना धक्के बसण्याची शक्यता.
  • मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. 

Topics mentioned in this article