जाहिरात

Gmail ते Zoho Mail : अमित शाहांप्रमाणे तुम्हालाही ई मेल स्विच करायचा आहे? फॉलो करा या सोप्या Step

Gmail ते Zoho Mail: तुम्हीही सुरक्षित आणि स्वदेशी Zoho Mail वर स्विच करण्याचा विचार करत असाल, तर ही प्रक्रिया खूप सोपी आहे. तुमच्या महत्त्वाच्या डेटाचे कोणतेही नुकसान न होता, तुम्ही सहजपणे स्विच करू शकता.

Gmail ते Zoho Mail : अमित शाहांप्रमाणे तुम्हालाही ई मेल स्विच करायचा आहे? फॉलो करा या सोप्या Step
Gmail ते Zoho Mail: तुम्ही देखील सोप्या पद्धतीने तुमचा ई मेल बदलू शकता.
मुंबई:

Switching from Gmail to Zoho Mail Complete Guide: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज (बुधवार, 8 ऑक्टोबर 2025) त्यांचा ईमेल पूर्णपणे भारतीय बनावटीच्या Zoho Mail प्लॅटफॉर्मवर (Made-in-India Zoho Mail) स्विच करण्याची घोषणा केली आहे.

अमेरिकेच्या शुल्क ( दबावाच्या पार्श्वभूमीवर, 'स्वदेशी' (Swadeshi) आणि 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला बळ देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे मानले जात आहे. काही दिवसांपूर्वीच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही Zoho च्या ऑफिस सूट सॉफ्टवेअरचा वापर सुरू करण्याची घोषणा केली होती.

अमित शाह यांनी काय म्हटले?

गृहमंत्री अमित शाह यांनी 'X' (पूर्वीचे Twitter) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्विच करण्याची माहिती दिली. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या पोस्टचा शेवट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शैलीत केला, ज्यामुळे ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे.

Zoho Mail का ठरत आहे पहिली पसंती?

Zoho Mail हे आता Gmail ला एक मजबूत पर्याय म्हणून लोकप्रिय होत आहे. गोपनीयता-केंद्रित (Privacy-focused) आणि जाहिरात-मुक्त (Ad-free) ईमेल हे झोहोचे वैशिष्य आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिक आणि छोट्या-मोठ्या उद्योगांमध्ये याला मोठी पसंती मिळत आहे.

( नक्की वाचा : Arattai vs WhatsApp: व्हॉट्सॲपला टक्कर देणारे 'अरट्टाई' ॲप कशासाठी चांगले? वाचा, 'दोघां'मधील मोठा फरक )

Zoho Mail ची प्रमुख वैशिष्ट्ये:

गोपनीयता आणि सुरक्षा (Privacy & Security): Zoho Mail चं डेटा गोपनीयतेला अधिक प्राधान्य आहे. त्यांच्याकडून डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत एनक्रिप्शन प्रोटोकॉल वापरण्यात येतो.

डेटा नियंत्रण (Data Control): वापरकर्त्यांना त्यांच्या इनबॉक्सवर अधिक नियंत्रण मिळते.

उत्पादकता-केंद्रित (Productivity-focused): हे प्लॅटफॉर्म विशेषतः उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून डिझाइन केलेले आहे.

कस्टम डोमेन सपोर्ट (Custom Domain Support): व्यवसाय आणि व्यावसायिकांसाठी कस्टम डोमेन सपोर्ट उपलब्ध आहे.

तुम्हालाही Gmail वरून Zoho Mail वर स्विच करायचे आहे?

गृहमंत्री अमित शाह यांच्या घोषणेनंतर, जर तुम्हीही सुरक्षित आणि स्वदेशी Zoho Mail वर स्विच करण्याचा विचार करत असाल, तर ही प्रक्रिया खूप सोपी आहे. तुमच्या महत्त्वाच्या डेटाचे कोणतेही नुकसान न होता, तुम्ही सहजपणे स्विच करू शकता.

( नक्की वाचा : WhatsApp Big Update: व्हॉट्सॲपवर लवकरच Instagram-Telegram सारखी सुविधा! मोबाईल नंबर न देता करा चॅट )

Gmail वरून Zoho Mail वर कसे स्विच करावे (How to transfer from Gmail to Zoho Mail)


1. Zoho Mail अकाउंट तयार करा:

सर्वात आधी Zoho Mail च्या वेबसाइटला भेट द्या.
तुमच्या गरजेनुसार 'Sign Up for Free' करा किंवा पेड (Paid) प्लॅन निवडा.

2. Gmail मध्ये IMAP सक्षम करा (Enable IMAP):

तुमच्या Gmail अकाउंटच्या Settings मध्ये जा.
Forwarding and POP/IMAP पर्यायावर क्लिक करा.
येथे IMAP पर्याय Enable करा. (यामुळे Zoho ला तुमच्या Gmail डेटाची माहिती ॲक्सेस करण्याची परवानगी मिळेल.)

3. Zoho चे मायग्रेशन टूल (Migration Tool) वापरा:

आता तुमच्या Zoho Mail अकाउंटच्या Settings मध्ये जा.
Import/Export सेक्शनमध्ये जाऊन Migration Wizard चा वापर करा.
या टूलच्या मदतीने तुम्ही तुमचे जुने Emails, Folders, आणि Contacts Gmail मधून Zoho Mail मध्ये इम्पोर्ट (Import) करू शकता.

4. ईमेल फॉरवर्डिंग सेट करा (Set up Email Forwarding):

पुन्हा Gmail च्या Settings मध्ये जा.
येथे तुमच्या नवीन Zoho Mail ॲड्रेसवर Forwarding Enable करा.
यामुळे तुमच्या Gmail वर येणारे कोणतेही नवीन मेसेज मिस होणार नाहीत आणि ते थेट तुमच्या नवीन Zoho Mail इनबॉक्समध्ये येतील.

5. संपर्क आणि अकाउंट्स अपडेट करा:

शेवटी, तुमच्या सर्व महत्त्वाच्या संपर्कांना (Contacts) तुमचा नवीन ईमेल ॲड्रेस कळवा.

बँकिंग (Banking), सबस्क्रिप्शन (Subscriptions) आणि सोशल मीडिया (Social Media) सारख्या सर्व महत्त्वाच्या सेवांमध्ये तुमचा नवीन ईमेल ॲड्रेस अपडेट करा.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com