
Jagdeep Dhankhar House Arrest Controversy Amit Shah Comments : माजी उपराष्ट्रपती जगदीश धनखड गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आहेत. धनखड यांनी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होताच पहिल्याच दिवशी तब्येतीचं कारण देत राजीनामा दिला. त्यानंतर आता या पदासाठी पुन्हा निवडणूक होत आहे. राजीनाम्यानंतर धनखड कुठे आहेत? हा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. त्यांना सरकारनं 'घरी नजरकैदेत' ठेवण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या सर्व आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले केंद्रीय गृहमंत्री?
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, "धनखड साहेबांचे राजीनामा पत्र स्वतःच स्पष्ट आहे. त्यांनी राजीनाम्यामागे आरोग्याचे कारण दिले आहे. त्यांनी त्यांच्या चांगल्या कार्यकाळाबद्दल पंतप्रधान आणि इतर मंत्री आणि सरकारी सदस्यांचे मनःपूर्वक आभार देखील व्यक्त केले आहेत."
काही विरोधी नेत्यांनी केलेल्या दाव्यानुसार, धनखड 'घरी नजरकैदेत' आहेत का, असे विचारले असता, अमित शाह म्हणाले की सत्य आणि असत्याचा अर्थ केवळ विरोधी पक्षांच्या वक्तव्यांवरुन काढू नये, असं त्यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : PM मोदींची पदवी सार्वजनिक होणार नाही... वाचा दिल्ली उच्च न्यायालयानं काय दिलं कारण? )
"तुमच्यासाठी सत्य आणि असत्याचा अर्थ विरोधी पक्ष जे म्हणेल त्यावरून काढला जातो असे दिसते. आपण या सगळ्या गोष्टींचा बाऊ करू नये. धनखड यांनी घटनात्मक पदावर काम केले. त्यांनी घटनेनुसार कर्तव्य बजावलं. वैयक्तिक आरोग्याच्या कारणांमुळे राजीनामा दिला. या विषयावर जास्त विचार करू नये," असे शाह यांनी स्पष्ट केले.
विरोधकांचा आरोप काय ?
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यापूर्वी धनखड यांच्या अचानक राजीनाम्यावर प्रश्न उपस्थित केला होता. उपस्थित केले. धनखड यांना सरकारने 'शांत' केले आहे, असा आरोप विरोधकांनी केला होता.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही केंद्रावर टीका केली, धनखड कुठे आहेत असा प्रश्न विचारला आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर (भाजप) देशाला 'मध्ययुगीन काळात' नेण्याचा आरोप केला.
"आपण मध्ययुगीन काळात परत जात आहोत, जिथे राजा कोणालाही आपल्या इच्छेनुसार पदावरून हटवू शकतो. निवडून आलेल्या व्यक्तीची कोणतीही संकल्पना नाही. त्याला तुमचा चेहरा आवडत नाही, म्हणून तो ईडीला गुन्हा दाखल करण्यास सांगतो आणि मग एक लोकशाहीने निवडून आलेली व्यक्ती 30 दिवसांच्या आत नाहीशी होते. तसेच, आपण नवीन उपराष्ट्रपती का निवडत आहोत हे विसरू नका. कालच मी एका व्यक्तीशी बोलत होतो आणि मी म्हणालो, जुने उपराष्ट्रपती कुठे गेले? ते गेले आहेत," असे गांधी यांनी 20 ऑगस्ट रोजी एका पत्रकार परिषदेत म्हंटले होते.
सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही धनखड सार्वजनिकरित्या दिसत नसल्यामुळे हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली पाहिजे का, असा प्रश्न उपस्थित केला होता.
पण, भाजपाने धनखड यांनी आरोग्याच्या कारणांमुळे राजीनामा दिला असल्याचे म्हटले आहे आणि त्यांच्यासोबत कोणतेही मतभेद असल्याचा दावा फेटाळून लावला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world