जाहिरात

भारतातच आहे Switzerland पेक्षा सुंदर ठिकाण! आनंद महिंद्राही झाले अवाक्..निसर्गाचा 'असा' Video कधी पाहिला नसेल

भारतातच आहे Switzerland पेक्षा सुंदर ठिकाण! आनंद महिंद्राही झाले अवाक्..निसर्गाचा 'असा' Video कधी पाहिला नसेल
Anand Mahindra Viral Tweet
मुंबई:

Anand Mahindra Shared Beautiful Nature Video : निसर्ग सौंदर्याने नटलेल्या भारत देशात अनेक सुंदर ठिकाणं आहेत. विशेषत: भारताच्या उत्तर-पूर्व भागात स्वर्गाहून सुंदर ठिकाणं पाहायला मिळतात. निसर्गाच्या कुशीत लपलेलं असंच एक ठिकाण आहे मेघालयमध्ये..घनदाट जंगल आणि डोंगरमाथ्यावर वसलेलं हे ठिकाणं जणू काही मिनी स्वित्झरलँडच असल्याचं बोललं जातं. मेघालयच्या एका गावातील नयनरम्य नजारा सोशल मीडियावर एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी या गावातील अनोखं सौंदर्य व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केलं आहे. महिंद्रा यांनी एक्स हँडलवर या गावाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या गावाची खासीयत काय आहे? पर्यटक या गावात कसे जाऊ शकतात? याची माहिती महिंद्रा यांनी व्हिडीओत सांगितली आहे. जाणून घेऊयात मेघालयच्या या गावातील खास वैशिष्ट्यांबाबत..

स्वर्गाहून सुंदर आहे नोंगज्नोंग 

मेघालयातील सर्वात सुंदर ठिकाणाचं नाव आहे नोंगज्नोंग, जे मेघालयच्या भल्या मोठ्या डोंगरावर वसलेलं आहे. खासी हिल्सच्या मावकिन्नेव मध्ये 1094 मीटर उंचीवर हे गाव वसलेलं आहे. या गावात जवळपास 1440 लोक राहतात. खासी आणि इंग्रजी अशा दोन भाषा या गावात बोलल्या जातात. शिलाँगपासून सुमारे 60 किमी अंतरावर नोंगज्नोंग गाव आहे. या गावामुळे मेघालयच्या सौंदर्यात भर पडली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या गावातील डोंगर माथ्यावर सूर्योदयचा एक शानदार नजारा पाहायला मिळतो. 

नोंगज्नोंगमध्ये काय काय पाहू शकता?

1) नोंगज्नोंग व्यू पॉईंट 

या गावातील डोंगरावर एक जबरदस्त व्यू पॉईंट आहे. पर्यटकांना ट्रेकिंग करण्यासाठीही हे ठिकाण एक चांगला पर्याय आहे. घनदाट झाडी असल्याने या डोंगरावर जणू काही हिराव शालूच पसरला आहे, असं अनेकांना वाटतं. सूर्याची कोवळी किरणे या डोंगरमाथ्यावर पडल्यावर सोनेरी रंगाची चादर पसरल्यासारखं दृष्यही निर्माण होतं.  येथे असणाऱ्या उमंगोट नदीवर राफ्टिंगही करू शकता. भारताच्या सर्वात स्वच्छ नद्यांपैकी एक अशी या नदीची खासीयत आहे. ही नदी एडवेंचर लवर्सचं मुख्य आकर्षण आहे. तसच इथे रिव्हर राफ्टिंग करून पर्यटक आनंद लुटत असतात. 

नोंगज्नोंगमध्ये कुठे राहू शकता?

येथील लोक साध्या जीवनशैलीत राहणं पसंत करतात. बहुतांश टुरिस्टला लोकल होम स्टे करणं आवडतं. येथे मुक्काम केल्यावर स्थानिक लोकांच्या कल्चरबाबत आणि त्यांच्या लाईफस्टाईलविषयी माहिती मिळते. 

नोंगज्नोंगमध्ये कसं जाल?

हवाई रस्ता : गुवाहाटी स्थित लोकप्रीय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतातील प्रमुख शहरांना जोडला गेला आहे. येथून नोंगज्नोंग जवळपास 100 किमी अंतरावर आहे. टॅक्सी किंवा बसने प्रवास करून या ठिकाणी पोहोचू शकता. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com