जाहिरात

Raja Raghuvanshi Case: 'हो मीच राजाला मारलं', सोनम रघुवंशीचा कबुलीनामा, SITसमोर सर्व सांगितलं

Raja Raghuvanshi Murder Case Update: याचबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून सोनम रघुवंशीने एसआयटी समोर आपला गुन्हा कबुल केला आहे. 

Raja Raghuvanshi Case: 'हो मीच राजाला मारलं', सोनम रघुवंशीचा कबुलीनामा, SITसमोर सर्व सांगितलं

Raja Raghuvanshi Murder Case: इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याकांड सध्या देशभरात चर्चेत आहे. हनिमूनला गेलेल्या राजा रघुवंशी याची पत्नी सोनम रघुवंशीनेच हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. पोलिसांनी याप्रकरणी सोनम रघुवंशीसह तीन जणांना अटक केली आहे. याचबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून सोनम रघुवंशीने एसआयटी समोर आपला गुन्हा कबुल केला आहे. मेघालय पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी सोनम रघुवंशीने राजा रघुवंशीबाबतचा तिचा गुन्हा कबूल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस चौकशीदरम्यान सोनम रघुवंशीने कबूल केले आहे की तिने तिच्या मित्रांसह मिळून ही हत्या केली आहे. या प्रकरणात सोनमला  साथ देणाऱ्या इतर आरोपींचीही पोलिस चौकशी करत आहेत. 

तत्पुर्वी, मेघालय पोलिस मंगळवारी रात्री उशिरा सोनम रघुवंशीसह शिलाँगला पोहोचले आहेत. शिलाँगमध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी सोनमची चौकशी सुरू केली आहे. या हत्येचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथून सोनमला अटक केली. या प्रकरणात, पोलिसांनी सोनमशिवाय आणखी चार आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये सोनमचा प्रियकर राज देखील आहे. या चार आरोपींसह पोलिस आता शिलाँगला पोहोचले आहेत.

(नक्की वाचा: Raja Raghuvanshi Murder Case : राजाशी लग्न ठरवलं, सोनमने आईला धमकी दिली; तेव्हाच सांगितला होता प्लॅन)

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व आरोपींची एकामागून एक चौकशी केली जात आहे. तसेच सोनमने इतरांसह राजाला ज्या शस्त्राच्या मदतीने मारले होते ते शस्त्रही पोलिसांना सापडले आहे. पोलिसांनी रक्ताने माखलेले कपडेही जप्त केले आहेत. यासोबतच, सोनमचा रेनकोटही जप्त केला आहे. पोलिस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

(नक्की वाचा: सोनमनं 'मंगळ दोष' दूर करण्यासाठी हत्या केली? राजाच्या वडिलांचा गंभीर आरोप, म्हणाले...)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com