Girl Child Marriage Scheme: मुलीचे लग्न हे प्रत्येक पालकांसाठी आनंदाचा क्षण असतो. पण घरची आर्थिक परिस्थिती बिकट असेल, तर मात्र पालक चिंताग्रस्त होतात.लग्न सोहळ्याचा खर्च, पाहुणचार या सर्व गोष्टींसाठी पैसाच महत्त्वाच ठरतो. अनेक पालकांची हीच अडचण लक्षात घेत पंजाब सरकारने ‘आशीर्वाद योजना' सुरू केली आहे. या योजनेमुळे कोणत्याही कुटुंबातील मुलीचं लग्न फक्त पैशांच्या कमतरतेमुळे थांबणार नाही. या योजनेअंतर्गत सरकार मुलीच्या लग्नासाठी थेट 51,000 रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. काय आहे ही योजना आणि या योजनेसाठी कसं अल्पाय कराल? जाणून घ्या सविस्तर माहिती.
कोणत्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळतो?
- अनुसूचित जाती (SC)
- पिछडा वर्ग (BC)
- इतर मागासवर्गीय जाती (OBC)
- ख्रिश्चन समुदायातील मुली
- कोणत्याही जातीतल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (EWS) मुली
- कोणत्याही जातीतल्या विधवा महिलेची मुलगी
- अनुसूचित जातीतील विधवा किंवा घटस्फोटीत महिला जर पुन्हा विवाह करत असेल, तर तिलाही या योजनेचा लाभ मिळतो.
नक्की वाचा >> बिल्डरांसह मेट्रो आणि एमएमआरडीएच्या कंत्राटदारांना KDMC चा इशारा, 3 बिल्डरांना प्रत्येकी 50 लाखाचा दंड..
योजनेच्या अटी काय आहेत?
मुलीचे वय लग्नाच्या दिवशी किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे.
कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ३२,७९० रुपयांपेक्षा जास्त नसावे.
मुलीचे पालक किंवा संरक्षक पंजाबचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे.
एका कुटुंबातील फक्त दोन मुलींच्या लग्नासाठीच या योजनेचा लाभ दिला जातो.
तिसऱ्या मुलीसाठी या योजनेअंतर्गत कोणतीही आर्थिक मदत दिली जात नाही.
कधी आणि कसे करावे अर्ज?
तुम्ही लग्नाची ठरलेली तारीख येण्यापूर्वीही अर्ज करू शकता.जर आधी अर्ज करता आला नाही, तर लग्नानंतर 30 दिवसांच्या आतही फॉर्म भरून जमा करू शकता. पण 30 दिवसांपेक्षा जास्त उशीर झाल्यास अर्ज प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात.
नक्की वाचा >> Viral Couple : कॉर्पोरेटची नोकरी सोडून लंडनमध्ये पाणीपुरीला बनवलं ब्रँड; नागपूरच्या मराठी कपलची सर्वत्र चर्चा
घरबसल्या ऑनलाइन अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा:
- https://ashirwad.punjab.gov.in/ashirwad/
- होमपेजवर ‘Applicant Registration' या पर्यायावर क्लिक करा.
- नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- फॉर्म सबमिट करा.
- अर्ज पूर्ण झाल्यानंतर तुमच्या दिलेल्या माहितीस सत्यापित केले जाईल.
- सर्व काही योग्य असल्यास 51,000 रुपयांची रक्कम थेट तुमच्या खात्यात पाठवली जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world