जाहिरात
10 minutes ago

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना पद आणि गोपनियतेची शपथ देणार आहेत. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री  अजित पवार आज दिल्लीत जाणार आहेत. एनडीएमधील प्रमुख घटक पक्षाचे नेते या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.  दुसरीकडे आज दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. त्यामुळे भारतीयांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. 

Live Update : आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आणखी 4 आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक

आयुष कोमकर हत्या प्रकरण

आयुष कोमकर हत्या प्रकरणातील अजून ४ आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक

आंदेकर परिवारातल्या चौघांना पुणे पोलिसांकडून गुजरात मधून अटक

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई 

शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंबेकर या चारही आरोपींना अटक

Live Update : धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची हजेरी

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची हजेरी

जिल्ह्यात रात्रभर सर्वदूर जोरदार पावसाने लावली हजेरी 

मुसळधार पावसामुळे शेती पिकांमध्ये  पाणीच पाणी

तेरणा नदीला पूर, ढोकी धाराशिव वाहतूक खोळंबली

नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

Live Update : जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण संवर्गासाठी राखीव झाल्याने 68 सदस्यांना अध्यक्षपदाचे दरवाजे खुले

राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने  जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी जाहीर केलेल्या आरक्षण सोडतीनुसार जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद पुढील अडीच वर्षासाठी सर्वसाधारण संवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले असून या निर्णयामुळे जिल्हा परिषदेतील निवड होणाऱ्या सर्व 68 सदस्यांसाठी अध्यक्षपदाचे दरवाजे खुले झाले आहेत. 2012 नंतर सर्वसाधारण संवर्गासाठी अध्यक्षपद खुले झाले असून त्यामुळे कोणत्याही गट किंवा जात प्रवर्गाचा सदस्य अध्यक्षपदासाठी दावेदार ठरू शकणार आहे मात्र आता अध्यक्षपदाचे निवडीनंतर गट व गणांच्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पहाटेपासून पुणे दौरा सुरू

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पहाटेपासून पुणे दौरा सुरू

6 वाजता अजित पवारांच्या दौऱ्याला सुरुवात 

शहरात सुरू असलेल्या उड्डाणपूलांच्या आणि विविध त्यांच्या कामांची अजित पवार यांच्याकडून पाहणी

पुण्यातील मुंडवा केशवनगर मधील रखडलेल्या उड्डाणपुलाची  अजित पवार यांनी केली पाहणी 

केशवनगर परिसरात होत असलेला उड्डाणपूल, मुंढवा सिग्नल परिसर आणि गाडीतळ भागातील रस्त्यांची देखील अजित पवार यांच्याकडून करण्यात येणार पाहणी 

अजित पवार यांच्यासह महापालिकेचे अधिकारी देखील उपस्थित

Live Update : जायकवाडी धरणाचे संपूर्ण 27 दरवाजे उघडले

जायकवाडी धरणाचे संपूर्ण 27 दरवाजे उघडले 

या वर्षात पहिल्यांदाच 27 दरवाजे उघडले 

जायकवाडी धरणातून 1 लाख 13 हजार 184 क्युसेकने विसर्ग सुरू 

जायकवाडीचे 9 आपत्कालीन दरवाजे देखील उघडले

दरवाजे 0.5 फूट उचलून 4.5 फूट पर्यंत उघडण्यात आले

Live Update : पुण्यातील बिल्डर लोकांना अजित पवारांचा इशारा

पुण्यातील बिल्डर लोकांना अजित पवारांचा इशारा

नागरिकांना समस्या येत असतील तर बिल्डरांचं काम थांबवा

नागरिकांनी फ्लॅट घेऊन जर बिल्डर लोकांना मस्ती आली असेल तर जे आपल्या हातात आहे ती ॲक्शन घ्या

केशवनगर भागातील काही सोसायटीमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही ही तक्रार नागरिकांनी आज सकाळी अजित पवारांकडे केली 

यानंतर अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना देखील फोन लावत केली चौकशी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com