
पुन्हा एक मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी पावसाची ब्रेक घेतला होता. त्यामुळे यंदा पाऊस लवकर परतला की काय अशी शक्यता व्यक्त केली जात होती. दरम्यान हवामान विभागाकडून आज रविवारी, 14 सप्टेंबर आणि सोमवार, 15 सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार वगळता संपूर्ण राज्यभरात पावसाचा अंदाज आहे. आयएमडीकडून महाराष्ट्राला यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. रायगडला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्या सोमवार, 15 सप्टेंबरलाही राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा, रत्नागिरी, पुणे, रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून राज्यातील इतर जिल्ह्यांना यल्लो अलर्ट आहे.
जोरदार वादळी पावसाचा इशारा (यल्लो अलर्ट) :
मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सोलापूर, धाराशिव, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा.
विजांसह वादळी पावसाचा इशारा (यल्लो अलर्ट) :
नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया
नक्की वाचा - Mumbai CNG PNG Problem: मुंबईत सीएनजी मिळण्यास प्रॉब्लेम होतोय? 'हे' आहे कारण
जळगाव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी
जळगाव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून पाऊस व ढगाळ वातावरणामुळे खरीप पिकांना धोका निर्माण झाला असून मका कपाशी उडीद मूग यासारख्या पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे.
जायकवाडी धरणाचे संपूर्ण 27 दरवाजे उघडले
या वर्षात पहिल्यांदाच जायकवाडी धरणारे सर्व 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत. जायकवाडी धरणातून १ लाख १३ हजार १८४ क्युसेकने विसर्ग सुरू झाला असून जायकवाडीचे 9 आपत्कालीन दरवाजे देखील उघडले आहेत. दरवाजे ०.५ फूट उचलून ४.५ फूटापर्यंत उघडण्यात आले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world