पत्नीसोबत घटस्फोट मिळाला, या आनंद एका पतीने अनोख्या पद्धतीने केला आहे. ज्या वेळी या पतीला समजले की आपला घटस्फोट मंजूर झाला आहे, त्याने त्याच वेळी घरा बाहेर दुधाने अंघोळ केली. हा प्रकार आसाममध्ये घडला आहे. आसाममधील नलबाड़ी जिल्ह्यात रहाणाऱ्या माणिक अली (Manik Ali) यांने कायदेशीररित्या पत्नीपासून वेगळे झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी असे केले आहे. माणिक अलींच्या दुधाने आंघोळ करतानाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रीया ही येत आहेत.
या व्हिडिओमध्ये माणिक अली म्हणतो, "आजपासून मी स्वतंत्र आहे." या व्हिडिओमध्ये माणिक पुढे म्हणतो की, "माझी पत्नी तिच्या प्रियकरासोबत वारंवार पळून जात होती. मी माझ्या कुटुंबाच्या आनंदासाठी त्यावेळी शांत राहीलो होता. पण आता माझ्या वकिलाने मला सांगितले की माझा घटस्फोट झाला आहे. म्हणून आता मी आनंद साजरा करण्यासाठी दुधाने स्नान करत आहे." स्थानिक लोकांच्या मते, त्यांची पत्नी यापूर्वीही दोन वेळा तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. त्याच वेळी या दोघांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.
माणिक अली यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. बहुतेक लोक याला एक लाजिरवाणी कृती (shameful act) म्हणत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, जिथे देशात अनेक असे लोक आहेत ज्यांना दोन वेळचे जेवण मिळत नाही, तिथे अशा प्रकारे दुधाची नासाडी कशा कामाची आहे. सोशल मीडियावर आणखी काही प्रतिक्रीया आल्या आहेत. त्या ते म्हणतात असे लोक केवळ व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी आणि काही लाईक्स मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या कृती करतात.