जाहिरात

दक्षिण कोरियाचे 60 लाख नागरिक अयोध्याला समजतात स्वत:चं 'माहेर', वाचा काय आहे कारण?

भारतामध्ये ही गोष्ट फारशी माहिती नसेल. पण, दक्षिण कोरियातील जवळपास 60 लाख नागरिकांची अयोध्या हे आपलं माहेर असल्याची समजूत आहे.

दक्षिण कोरियाचे 60 लाख नागरिक अयोध्याला समजतात स्वत:चं 'माहेर', वाचा काय आहे कारण?
मुंबई:

दक्षिण कोरियन नागरिकांच्या 78 सदस्यांचे खंडपीठ दोन दिवसांच्या अयोध्या यात्रेवर होते. या काळात त्यांनी श्रीराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्याचप्रमाणे अयोध्येवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. या शिष्टमंडळानं गुरुवार आणि शुक्रवार (13 आणि 14 मार्च 2025) अयोध्या यात्रा केली, अशी माहिती अयोध्येचे महापौर गिरीश पती त्रिपाठी यांनी दिली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दक्षिण कोरियाच्या कारक वंशाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या सांस्कृतिक वारशांचं स्मरण केलं. त्यांनी नव्या घाटावरील रानी हियो मेमोरियल पार्कचाही दौरा केला. त्याचबरोबर अडीच वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या स्मारकामध्ये श्रद्धांजली वाहिली. 

( नक्की वाचा : Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्याबाबत पाकिस्तानमध्ये सर्च का केले जात आहे? समजून घ्या खरा अर्थ )
 

त्रिपाठींनी शुक्रवारी सांगितलं की, या शिष्टमंडळानं गुरुवारी राम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्याचबरोबर शरयू नदीच्या किनाऱ्यावर झालेल्या आरतीमध्येही ते सहभागी झाले. दक्षिण कोरियाच्या प्रतिनिधीमंडळानं अयोध्यावासियांना होळीच्या शुभेच्छा देखील दिल्या. 

Latest and Breaking News on NDTV

त्यांनी सांगितलं की, भारतामध्ये ही गोष्ट फारशी माहिती नसेल. पण, दक्षिण कोरियातील जवळपास 60 लाख नागरिक स्वत:ला सुरीरत्नाचे वंशज समजतात. त्यामुळे अयोध्या त्यांचे माहेर असल्याची त्यांची श्रद्धा आहे. 

कोरियन पौराणिक कथेनुसार, अयोध्येतील राजकुमारी सूरीरत्नाने सुमारे 2,000 वर्षांपूर्वी एका बोटीने समुद्र पार करून कोरियाला गेल्या. त्यांनी  राजा किम सुरोशी लग्न केले. सुरोने उत्तर आशियाई देशातगया साम्राज्य स्थापन केले होते. राजकुमारी सुरीरत्न नंतर  हिओ ह्वांग-ओके राणी बनल्या.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: