बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातील बाबा सिद्धनाथ मंदिरात रविवारी रात्री उशिरा चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला, तर 35 जण जखमी झाले. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये बहुतांश कावडियांचा समावेश आहे.
बिहार के जहानाबाद में बड़ा हादसा
— NDTV India (@ndtvindia) August 12, 2024
बिहार के जहानाबाद में स्थित बाबा सिद्धेश्वर नाथ के मंदिर में अचानक से मची भगदड़ की चपेट में आकर 7 लोगों की मौत हो गई है. जबकि इस हादसे में दर्जनों श्रद्धालु घायल हुए हैं. सावन के दौरान इस मंदिर में भक्तों का तांता लगा रहता हैं और दूर-दूर से लोग… pic.twitter.com/S5vX4PW9Ya
जिल्हाधिकारी अलंकृता पांडे यांनी पीटीआयला सांगितले की, प्रथमदर्शनी असे दिसते की कावडियांमध्ये कशावरून तरी वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची आणि हाणामारी झाली. ज्यामुळे मंदिरात चेंगराचेंगरी झाली. पांडे यांनी सांगितले की, ही घटना रविवारी रात्री उशिरा रात्री 11.30 च्या सुमारास घडली.
जहानाबाद पोलिसांनी 7 जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. तर 35 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर स्थानिक मखदुमपूर आणि इतर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशासनाच्या अनास्थेमुळे हा प्रकार घडल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रशासनाने सुरक्षेसाठी नॅशनल कॅडेट कॉर्प्सचे लोक तैनात केले होते आणि त्यांनी भाविकांवर लाठ्यांचा वापर केला. त्यामुळे लोकांची धावपळ सुरू झाली आणि काही लोक पडले. हा सर्वस्वी प्रशासनाचा दोष आहे, असा आरोपी नागरिकांचा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world