जाहिरात

Bank Strike : 27 जानेवारी रोजी देशभरात बँक युनियन संपावर; कोणकोणत्या बँका बंद राहतील?

मंगळवार, २७ जानेवारी रोजी बँक सुरू असतील की बंद? देशभरातली बँक कर्मचाऱ्यांच्या युनियनने ५ दिवसांच्या आठवडा या मागणीसाठी २७ जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारला आहे.

Bank Strike : 27 जानेवारी रोजी देशभरात बँक युनियन संपावर; कोणकोणत्या बँका बंद राहतील?
Bank Strike
  • बैंक कर्मचारियों की यूनियनों ने 27 जनवरी को देशव्यापी हड़ताल का ऐलान किया है.
  • इससे बैंक से जुड़े काम प्रभावित हो सकता है. कई शहरों में हड़ताल को लेकर प्रदर्शन भी शुरू हो चुका है.
  • वीक में 5 डे वर्किंग की मांग को लेकर बैंक यूनियंस ने यह हड़ताल बुलाई है.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

जर तुम्ही २७ जानेवारी रोजी बँकेचं काम करण्याचा प्लान करीत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मंगळवार, २७ जानेवारी रोजी बँक सुरू असती की बंद? देशभरातली बँक कर्मचाऱ्यांच्या युनियनने ५ दिवसांच्या आठवडा या मागणीसाठी २७ जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने हा संप पुकारला आहे. त्यामुळे  देशभरातील बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

आठवड्यात हवेत पाच दिवस कामाचे...

बँकांमध्येही आठवड्याचे पाच दिवस कामाचे असावेत आणि दोन दिवस सुट्टी असावी अशी मागणी युनियनकडून करण्यात आली आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचं म्हणणं आहे की, २०२४ मध्ये भारतीय बँक संघासोबत झालेल्या वेतन  दुरुस्ती करारात प्रत्येक शनिवारी सुट्टी देण्यावर संमती दर्शवली होती. मात्र अद्याप ही दुरुस्ती लागू करण्यात आलेली नाही. या विलंबाच्या निषेधार्थ बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. 

सद्यस्थितीत बँक कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. याशिवाय इतर शनिवारी बँकेत काम सुरू असतं. त्यामुळे महिन्याचे दोन आठवडे कर्मचाऱ्यांना सहा दिवस काम करावं लागतं. 

नक्की वाचा - GK News : कसं करायचं वंदे भारत ट्रेनचं तिकीट बुकिंग? IRCTC मध्ये किती तिकीट बुक करू शकता? अनेकांना माहितच नाही

कोणकोणत्या बँकांचा बंदमध्ये समावेश?

या बंदमध्ये देशभरातली सर्व प्रमुख सरकारी बँकांचा समावेश असेल. ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडियास कॅनरा बँक, इंडियन बँकसह अन्य सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा समावेश आहे. अनेक शहरांमध्ये बँक कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे आणि मागणी मान्य केली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. 


दररोज ४० मिनिटं अतिरिक्त काम करण्यास तयार...

बँक युनियनने सांगितलं की, पाच दिवस कामाच्या वेळापत्रकाच्या अंमलबजावणीमुळे कामाचे तास कमी होणार नाहीत. कर्मचारी सोमवार ते शुक्रवार दररोज अंदाजे ४० मिनिटे जास्त काम करण्यास तयार आहेत, जेणेकरून त्यांचा एकूण आठवड्याच्या कामाच्या वेळेवर परिणाम होणार नाही. हा संप २६ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू होईल आणि २७ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत चालेल. या काळात देशभरातील बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये रोख व्यवहार, चेक क्लिअरन्स आणि इतर शाखांशी संबंधित कामांचा समावेश आहे.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com