Marriage News : नवरदेवाने नवरीऐवजी मित्राच्या गळात घातला हार; त्यानंतर जे घडलं त्याचा कुणी विचारही केला नसेल

लग्न मोडल्यानंतर तरुणाच्या वडिलांनी त्याच्या मित्रांवर कोल्ड्रिंकमध्ये मादक गोळ्या मिसळून त्याला प्यायला लावल्याचा आरोप केला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

नवरदेवाने मद्यधुंद अवस्थेत नवरीऐवजी मित्रांच्या गळ्यात हार घातला. या घटनेमुळे संतापलेल्या नवरीन थेट लग्नच मोडलं. बरेलीच्या क्योल्डियामध्ये ही घटना घडली आहे. नवरा मुलगा पिलीभीत जिल्ह्यातील बरखेडा येथील आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री लग्नाची मिरवणूक आली होती. वरमाला विधी दरम्यान वधू आणि वर स्टेजवर पोहोचले. वधूने वराच्या गळ्यात हार घातला. दरम्यान, दारूच्या नशेत असलेल्या वराने त्याच्या मित्राच्या गळ्यात हार घातला. यामुळे संतापलेल्या वधूने लग्न करण्यास नकार दिला आणि लग्नाची मिरवणूक परत पाठवली. 

दरम्यान नातेवाईकांनी नवरीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नवरदेवाला आणि त्याचे वडील बाबुराम यांना पोलिस ठाण्यात आणले. नवरीच्या वडिलांच्या तक्रारीवरून, वरावर हुंडाची मागणी आणि सार्वजनिक अपमानाच्या कलमांखाली तक्रार दाखल केली आहे. शांतता भंग केल्याबद्दल पोलिसांनी वर, त्याचे वडील आणि तीन मित्रांवरही कारवाई केली आहे

लग्न मोडल्यानंतर तरुणाच्या वडिलांनी त्याच्या मित्रांवर कोल्ड्रिंकमध्ये मादक गोळ्या मिसळून त्याला प्यायला लावल्याचा आरोप केला आहे. बाबुराम यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा रवींद्र कुमार दारू पित नाही. त्याच्या मित्रांनी कपटाने कोल्ड्रिंकमध्ये एक औषधाची गोळी मिसळली आणि त्याला ते प्यायला लावले. नवरदेवाच्या बहिणीने आणि त्याच्या नातेवाईकांनी नवरीला विनंती केली, पण तिने कुणाचही म्हणणं ऐकलं नाही. 

Advertisement
Topics mentioned in this article