जाहिरात

Crime News: घरी कुणी नसताना बॉयफ्रेंडला घरी बोलावलं, अन्... प्रेयसीचं थरकाप उडवणारं कृत्य, VIDEO ही काढला

Bengaluru Horror: प्रेरणा आणि किरण (दोघांचे वय 27 वर्षे) हे एका टेलिकॉम स्टोअरमध्ये एकत्र काम करत होते. गेल्या एक वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंध होते.

Crime News: घरी कुणी नसताना बॉयफ्रेंडला घरी बोलावलं, अन्... प्रेयसीचं थरकाप उडवणारं कृत्य, VIDEO ही काढला

Bengaluru Crime News: "प्रेमात सगळं माफ असतं" असं म्हटलं जातं, पण बंगळुरूमध्ये प्रेमाचं रूपांतर एका भीषण हत्यांकाडात झालं आहे. एका 27 वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकराला लग्नासाठी प्रपोज करण्याच्या नावाखाली घरी बोलावले. त्याचे डोळे झाकून त्याला खुर्चीला बांधलं. आणि त्यानंतर अंगावर रॉकेल ओतून त्याला जिवंत जाळले. या घटनेमुळे संपूर्ण बंगळुरू शहर हादरून गेले आहे.

काय आहे हे प्रकरण?

प्रेरणा आणि किरण (दोघांचे वय 27 वर्षे) हे एका टेलिकॉम स्टोअरमध्ये एकत्र काम करत होते. गेल्या एक वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून किरण आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि तो लग्नासाठी तयार नाही, अशी भावना प्रेरणाच्या मनात घर करून होती. याच रागातून तिने किरणचा काटा काढण्याचे ठरवले.

(नक्की वाचा-  Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)

प्रपोजच्या नावाखाली घात

मंगळवारी प्रेरणाने तिची आई आणि भाऊ घरी नसताना किरणला दक्षिण बंगळुरूच्या अंजनापुरा येथील घरी बोलावले. घरी आल्यावर काही वेळ गप्पा मारल्यानंतर प्रेरणाने किरणला सांगितले की, तिला त्याला एका वेगळ्या पद्धतीने प्रपोज करायचे आहे, जे सध्या परदेशात खूप लोकप्रिय आहे. तिने किरणच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि त्याला एका खुर्चीवर बसवून त्याचे हात-पाय घट्ट बांधले. किरणने सुरुवातीला विरोध केला, पण प्रेरणाच्या 'सरप्राईज' शब्दावर विश्वास ठेवून तो शांत बसला. किरण पूर्णपणे असहाय्य झाल्यावर प्रेरणाने आधीच आणून ठेवलेले रॉकेल त्याच्या अंगावर ओतले आणि त्याला आग लावली.

(नक्की वाचा-  Pune News: रिंग रोडसाठी शेतकरी कुटुंबाला रस्त्यावर आणलं; डोळ्यासमोर संसार उद्ध्वस्त)

कॅमेऱ्यात कैद केला मृत्यूचा थरार

पोलीस तपासात समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, प्रेरणाने किरणला आग लावल्यानंतर पळून न जाता, तो जिवंत जळत असतानाचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले. किरण मदतीसाठी ओरडत असताना ती शांतपणे कॅमेऱ्यात सर्व दृश्ये कैद करत होती. पोलिसांनी तिचा मोबाईल जप्त केला असून त्यात हत्येचे पुरावे सापडले आहेत.

शेजाऱ्यांनी धूर आणि ओरडण्याचे आवाज ऐकल्यानंतर पोलिसांना पाचारण केले. मात्र, तोपर्यंत किरणचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी प्रेरणाला अटक केली असून तिने आपला गुन्हा कबूल केला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com