Viral Video: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. असाच एक भयानक प्रकार बंगळुरूमध्ये पाहायला मिळाला. व्यालिकवल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कुरिअर ऑफिसमध्ये मंगळवारी एका कुटुंबाने मोठे पार्सल आणले. संशयावरून जेव्हा कर्मचाऱ्यांनी ते पार्सल उघडले, तेव्हा आतमध्ये एक वृद्ध व्यक्ती पाहून सर्वांचेच धाबे दणाणले. मात्र कुटुंबीयांना चूक मान्य करण्याऐवजी कर्मचाऱ्यांशीच वाद घातला.
नेमकं काय घडलं?
एक महिला, तिचा पती, सासू आणि दीर असे पाच जण एक मोठे पोते घेऊन कुरिअर ऑफिसमध्ये पोहोचले होते. पार्सलमध्ये काय आहे असे विचारल्यावर कुटुंबाने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने ते पार्सल उघडले. पोते उघडताच त्यामध्ये महिलेचे वडील असल्याचे समोर आले. ते वृद्ध गृहस्थ प्रचंड घाबरलेले होते आणि त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत होता.
पाहा VIDEO
(नक्की वाचा- Nashik News: महाराष्ट्राची एपस्टीन फाईल! सुषमा अंधारेंचा चाकणकरांवर हल्लाबोल; 'कॅप्टन' खरात प्रकरणी गंभीर आरोप जेव्हा कर्मचाऱ्यांनी जाब विचारला, तेव्हा या कुटुंबाने दिलेले उत्तर ऐकून सगळेच चक्रावले. आगामी सणासुदीच्या दिवसांमुळे बसची सर्व तिकिटे बुक झाली आहेत, हे त्यांना रीलमधून दाखवायचे होते. अशावेळी प्रवास करण्यासाठी आता फक्त 'माणसाला कुरिअर करणे' हाच एकमेव पर्याय उरला आहे, असे मजेशीर रील त्यांना शूट करायचे होते. या कुटुंबाला आपल्या कृत्याचा जराही पश्चात्ताप नव्हता. उलट, "आम्ही इतक्या लांबून आलो आहोत आणि इतकी मेहनत घेतली आहे, तर हे पार्सल स्वीकारलेच पाहिजे," असा अजब युक्तिवाद त्यांनी कुरिअर कर्मचाऱ्यांशी केला. कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे त्या वृद्ध व्यक्तीचा एकप्रकारे जीव वाचला आहे.'रील' बनवण्यासाठी जीव धोक्यात
पकडले गेल्यावरही वाद!