आयटी हब असलेल्या बंगळुरू शहरात एका उच्चशिक्षित महिलेने कौटुंबिक वादाला कंटाळून आपले जीवन संपवले आहे. सुषमा (35 वर्ष) असे या मृत महिलेचे नाव असून, ती प्रसिद्ध आयटी कंपनी 'डेल' (Dell) मध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत होती. मंगळवारी राहत्या घरी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
स्वयंपाकावरून झाला होता वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुषमा आणि तिची सासू *कल्पना* यांच्यात मंगळवारी स्वयंपाक करण्याच्या कारणावरून जोरदार भांडण झाले होते. सुषमाच्या माहेरच्या लोकांनी आरोप केला आहे की, सासू तिला स्वयंपाक करू देत नसे आणि छोट्या-छोट्या कारणांवरून तिचा वारंवार छळ केला जात असे. सुषमा आणि पुनीत कुमार यांचे लग्न 5 वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना 4 वर्षांचा एक मुलगा आहे. गेल्या काही काळापासून घरात किरकोळ कारणावरून वारंवार वाद होत होते.
(नक्की वाचा- T20 World Cup: ...तर सामना न खेळताच भारत विश्वचषकातून बाहेर होणार? काय आहे ICC चा नियम?)
पतीला अटक, सासू फरार
या घटनेनंतर सुषमाच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत सासरच्या मंडळींवर हुंडाबळी आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी पती पुनीत कुमार याला तातडीने अटक केली आहे. घटनेनंतर सासू कल्पना ही फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
(नक्की वाचा- Iran News: अण्वस्त्र चाचणी की भूकंप? युद्धादरम्यान इराणची जमीन हादरली; जगभरात चिंतेचं वातावरण)
उच्चशिक्षितांमधील कौटुंबिक हिंसाचार
एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या इंजिनिअर महिलेने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे, उच्चशिक्षित कुटुंबांमधील अंतर्गत कलह आणि मानसिक दबावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. किरकोळ वादाचे रूपांतर आत्महत्येपर्यंत पोहोचणे हे चिंतेचे लक्षण मानले जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world