सावधान! मुंबई पुढील 16 वर्षांत होणार गायब? मुंबईकरांची चिंता वाढवणारे संशोधन समोर

Mumbai Sea Level: बंगळुरू थिंक टँकच्या अहवालाद्वारे समोर आलेल्या माहितीनुसार, समुद्रपातळीमध्ये होणारी वाढ भारतीय किनारपट्टीवरील शहरांसाठी अतिशय धोकादायक ठरत आहे. ज्यावर काम करणे आवश्यक आहे.

Advertisement
Read Time: 4 mins

Mumbai Sea Level: देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आता समुद्राच्या पातळीत वाढ होताना दिसत आहे. बंगळुरू थिंक टँकच्या अहवालानुसार, 2040 पर्यंत मुंबईचा सुमारे 13.1% भाग समुद्रामध्ये बुडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे मुंबई शहरावर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अहवालामध्ये केवळ हा एकच अंदाज वर्तवण्यात आलेला नाही, तर सत्य देखील सांगितले गेलेय जे जागतिक तापमानवाढीमुळे प्रकर्षाने समोर आले आहे. 

बंगळुरू थिंक टँकचा अहवालात नेमके काय म्हटले गेले आहे?

बंगळुरू थिंक टँकच्या अहवालातील माहितीनुसार, समुद्र पातळी वाढणे हे भारतीय किनारपट्टीवरील शहरांसाठी धोकादायक ठरत आहे. ज्यावर काम करणे अतिशय आवश्यक आहे. जागतिक पातळीवरील डेटा शोधून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. लेटेस्ट IPCCमध्ये उपलब्ध असलेल्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे. ग्लोबल ट्रेंडमध्ये या कंपनीने ऐतिहासिक कालखंडातील सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक कल पाहून अभ्यास केला आहे. उत्सर्जनामध्ये जीवाश्म इंधनाचा समावेश अधिक असल्याचे आढळून आले. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मोठ्या प्रमामात नुकसान होण्याची शक्यता आहे. 

(नक्की वाचा: 'जे आरोप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले तेच आरोप पुन्हा हिंडनबर्गने करणे दुर्दैवी')

पाणी पातळी वाढल्यानंतर मच्छीमार आणि जलचरांनाही मोठा फटका बसू शकतो. पायाभूत सुविधांमध्येही आपण कमकुवत पडू शकतो. याकरिता क्लायमेट लेबल आणि पाण्याशी संबंधित जोखमीकडे लक्ष द्यावे लागेल. या प्रभाग स्तरावरील अभ्यासामुळे आपण सक्षम होऊ शकतो तसेच लोक आणि त्यांची जीवनशैली समजून घेता येईल. अभ्यासानंतर इको सिस्टीम अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल.

मुंबईची खरी ओळख नाहीशी होईल?

पाणी पातळी वाढणे हा आर्थिक राजधानीसाठी मोठा धोका असल्याचे पर्यटन तज्ज्ञांनी म्हटले आहे. गेटवे ऑफ इंडिया आणि मरीन लाइन्स यासारखी पर्यटन स्थळे पाण्यात बुडल्यास पर्यटकांची संख्या कमी होईलच पण मुंबईची  ओळखही नाहीशी होऊ शकते. अशा पद्धतीने समुद्राची पातळी वाढल्याने पर्यटन उद्योगास अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. अन्य देशांतून येणाऱ्या पर्यटकांसाठी मुंबई एण्ट्री किंवा एक्झिट स्पॉट नक्कीच असते. परिणामी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यास लोक मुंबई वगळता अन्य शहरांतून विमान प्रवास करणे पसंत करतील. सरकार जसे रस्तेबांधणी आणि अन्य क्षेत्राकडे लक्ष देत आहे, त्याचप्रमाणे आता मुंबईच्या या मोठ्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Advertisement

(नक्की वाचा : कल्याणमध्ये 13 वर्षाच्या मुलाने गळफास घेत संपवलं आयुष्य; चिठ्ठी वाचून सगळ्यांनाच धक्का बसला)

समुद्राच्या पाणी पातळीत का होतेय वाढ?

समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होण्यामागील कारण म्हणजे समुद्राजवळील नवीन इमारतींचे बांधकाम असू शकते, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. याचे आगामी काळामध्ये दुष्परिणाम पाहायला मिळू शकतात. जेथे समुद्रातील पाण्याची पातळी वाढतेय आणि वाऱ्याचा वेग बदलतोय. तेथे समुद्राचे पाणी वाढत असल्याने समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या मुंबईसारख्या शहरासाठी हे संकट फारच गंभीर ठरू शकते. समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्या बांधकामांमुळे पाणी पुढे ढकलले जात आहे. पण याउलट दुसऱ्या बाजूने पाणी अधिक तीव्रतेने आत येते आणि परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात मोठ्या प्रमाणात जीवित, मालमत्तेसह लोकांचे मोठे नुकसान होऊ शकते.

(नक्की वाचा: भारतीय शेअर बाजाराच्या मजबूतीमुळे हिंडनबर्ग अस्वस्थ, नवा रिपोर्ट बाजार कोसळवण्यासाठीच: तज्ज्ञ)

मच्छीमार आहेत त्रस्त

मुंबईतील बधवार कोळीवाड्यामध्ये राहणारे मच्छीमार रवींद्र तांडेल यांनी सांगितले की, समुद्राची पाणी पातळी वाढल्याने त्यांच्या घरात पाणी येऊ लागले आहे. गेल्या 40 वर्षांत त्यांनी अशा पद्धतीने समुद्राची पातळी वाढल्याचे पाहिलेय. त्यामुळे भविष्यात समुद्राच्या पाणी पातळीत होणाऱ्या वाढीबाबत त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. त्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केलीय. 50 वर्षांपासून समुद्र किनाऱ्यावर वास्तव्य करणारे अशोक मच्छीमार प्रेमनाथ पाटील यांनीही चिंता व्यक्त केलीय. माशांच्या संख्येत मोठी घट झालील, आर्थिक नुकसान होते, वादळांचा वाढता धोका, जीवनशैलीस निर्माण होणाऱ्या नुकसानामुळे आता जायचे कुठे? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

Advertisement

शहरांच्या अस्तित्वाला वाढतोय धोका

सद्य परिस्थितीत भारतासह जगातील अनेक भागात समुद्राच्या पातळीत होणारी वाढ ही चिंतेची बाब ठरत आहे. ग्लोबल वॉर्मिग आणि हवामानातील बदल हे यामागील प्रमुख कारण आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, महासागराचे पाणी गरम होत आहे आणि बर्फांचे थर वेगाने वितळत आहेत, याचा सर्वात मोठा परिणाम किनारपट्टीवरील शहरांवर होत आहे, जेथे पाण्याच्या पातळी सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत यामुळे होणार विध्वंस रोखण्यासाठी तातडीने पावले उचलली नाहीत तर भविष्यात या शहरांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.

Topics mentioned in this article