जाहिरात

कल्याणमध्ये 13 वर्षाच्या मुलाने गळफास घेत संपवलं आयुष्य; चिठ्ठी वाचून सगळ्यांनाच धक्का बसला

विघ्नेशजवळ एक सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये एका मुलाने व शिक्षिकेने त्याला चिडवल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे नमूद केले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

कल्याणमध्ये 13 वर्षाच्या  मुलाने गळफास घेत संपवलं आयुष्य; चिठ्ठी वाचून सगळ्यांनाच धक्का बसला

अमजद खान, कल्याण

कल्याणमध्ये एका 13 वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. विघ्नेश पात्रा असे या मुलाचे नाव आहे.  विघ्नेश आपले वडील प्रमोद कुमार, आई आणि बहिणीसोबत कल्याण पूर्वेकडील  शिवाजीनगर चिकणीपाडा परिसरातील राहत होता.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कल्याण पूर्व परिसरातील एका नामांकित शाळेत  इयत्ता आठवीत तो शिक्षण घेत होता .  त्याचे वडील नेहमीप्रमाणे कामावर गेले. त्याची आई व बहीण कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. त्या वेळेला त्याने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. 

ट्रेंडिंग बातमी - 'तुमच्या आजोबांना विचारा किती कुटुंब...' विखे पाटील रोहित पवारांवर भडकले

विघ्नेशजवळ एक सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये एका मुलाने व शिक्षिकेने त्याला चिडवल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे नमूद केले असल्याची प्राथमिक माहिती आहे. कोळशेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत याप्रकरणी नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
काँग्रेस आमदार पोहोचला, पाठोपाठ अजित पवारही पोहोचले; 'सागर' वरील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
कल्याणमध्ये 13 वर्षाच्या  मुलाने गळफास घेत संपवलं आयुष्य; चिठ्ठी वाचून सगळ्यांनाच धक्का बसला
Badlapur physical assault case accused house vandalized by Villagers
Next Article
बदलापूरच्या नराधमाचे अवघ्या 24 वर्षात 3 लग्न; तिन्ही बायका गेल्या सोडून