जाहिरात

हनिमून ते मृत्यू... बायकोच्या आत्महत्येनंतर नवऱ्यानेही आयुष्य संपवलं, आईचीही मृत्यूशी झुंज

सूरज आणि 26 वर्षीय गणवी यांचे 29 ऑक्टोबर 2025 रोजी बेंगळुरूमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते. लग्नानंतर ते हनिमूनसाठी श्रीलंकेला गेले होते.

हनिमून ते मृत्यू... बायकोच्या आत्महत्येनंतर नवऱ्यानेही आयुष्य संपवलं, आईचीही मृत्यूशी झुंज
  • बेंगलुरु में अपनी पत्‍नी की मौत के बाद एक पति ने दहेज उत्पीड़न के आरोपों के बीच नागपुर में आत्महत्या कर ली.
  • गणवी की मौत के बाद उसके परिवार ने पति सूरज शिवन्ना और परिजनों के खिलाफ पुलिस में शिकायत दर्ज कराई.
  • सूरज शिवन्ना ने नागपुर के एक होटल में आत्महत्या की जबकि उनकी मां की आत्महत्या की कोशिश के कारण हालत गंभीर है.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

बेंगळुरू येथील 36 वर्षीय सूरज शिवन्ना याने पत्नीच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या तणावामुळे आणि हुंडाबळीच्या आरोपांमुळे महाराष्ट्रातील नागपूर येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. त्याच्यासोबत गेलेल्या आईनेही टोकाचे पाऊल उचलले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. केवळ दोन महिन्यांपूर्वी लग्नाच्या बेडीत अडकलेल्या या जोडप्याचा असा अंत होईल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती.

नेमके काय घडले?

सूरज आणि 26 वर्षीय गणवी यांचे 29 ऑक्टोबर 2025 रोजी बेंगळुरूमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते. लग्नानंतर ते हनिमूनसाठी श्रीलंकेला गेले होते. मात्र, तिथेच त्यांच्यात खटके उडू लागले आणि नियोजित सहल अर्ध्यावर सोडून ते गेल्या आठवड्यात बेंगळुरूला परतले.

(नक्की वाचा-  Pimpri Chinchwad: 'असले धंदे खपवून घेऊ नका!' पिंपरी-चिंचवडमधील सभेत अजित पवारांचा भाजपवर थेट निशाणा)

मंगळवारी कौटुंबिक वाद आणि सासरच्यांकडून अपमान झाल्याच्या कारणावरून गणवीने राहत्या घरी छताच्या पंख्याला लटकून आत्महत्येचा प्रयत्न केला. गुरुवारी उपचारादरम्यान गणवीचा मृत्यू झाला. तिच्या पालकांनी सूरज आणि त्याच्या कुटुंबाविरोधात हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

शनिवारी बेंगळुरूमध्ये सासरच्या मंडळींनी घराबाहेर निदर्शने करून अटकेची मागणी केल्याने घाबरलेला सूरज आणि त्याची आई जयंती नागपूरला गेले. तिथे वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये सूरजने आत्महत्या केली, तर आईनेही तसाच प्रयत्न केला.

(नक्की वाचा - Nashik News: मनसेतून भाजपमध्ये हसहसत गेले, दुसऱ्याच दिवशी भर स्टेजवर ढसाढसा रडले! त्या नेत्या सोबत काय घडलं?)

हुंड्याचा आरोप आणि पोलीस तपास

गणवीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, लग्नानंतर काही दिवसांतच तिला हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. यामुळेच तिला माहेरी परत आणावे लागले होते. सूरजच्या आत्महत्येची माहिती त्याचा भाऊ संजय शिवन्ना याने नागपूर पोलिसांना दिली. सध्या सूरजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, त्याची आई नागपूरच्या स्थानिक रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com