एअर इंडिया एक्सप्रेसकडून सामूहिक रजेवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. कंपनीने तब्बल 25 जणांचं निलंबन केलं आहे.
8 मे रोजी एअर इंडिया एक्सप्रेसच्या तब्बल 300 कर्मचाऱ्यांनी अचानक आचारपणाचं कारण देत सामूहिक रजा घेतल्याचं समोर आल्यानंतर एअरलाइन्स क्षेत्रात खळबळ उडाली होती. यानिमित्ताने पुन्हा एकदा टाटा ग्रुपच्या एअरलाइन्स कंपनीवरील आर्थिक संकट आणि व्यवस्थापनातील गोंधळ समोर आला आहे. कर्मचाऱ्यांनी अचानक घेतलेल्या सामूहिक रजेमुळे कंपनीचा गोंधळ उडाला होता. त्यानंतर कंपनीने उड्डाणांची संख्या कमी करणे आणि 86 उड्डाणं रद्द करण्याचं जाहीर केलं होतं. यानंतर आज एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीने सामूहिक रजेवर गेलेल्या 30 कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे. येत्या काळात निलंबनाच्या कारवाईत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बातमी अपडेट होत आहे.