पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. भाजप सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसात भ्रष्टाचारा विरूद्ध कठोर निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्याबाबतची संपुर्ण तयारीही झाल्याचं त्यांनी सांगितलं. राजस्थानमधील पुष्कर येथील जाहीर सभेत ते बोलत होते. आता पर्यंत भ्रष्टाचारा विरूद्ध जी काही कारवाई केली गेली तो फक्त ट्रेलर होता, खरी अॅक्शन पुढे होणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पहिल्या 100 दिवसाचा प्लॅन काय?
मोदी सरकारच्या पहिल्या दोन टर्ममध्ये भ्रष्टाचारा विरोधात मोहीम उघडली गेली होती. भ्रष्टाचारा विरोधातला हा लढा असाच सुरू राहाणार आहे. भाजप तिसऱ्यांदा सरकार बनवेल. सरकार झाल्यानंतर पहिल्या शंभर दिवसात भ्रष्टाचारा विरोधात मोठे आणि कठोर निर्णय घेणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. याबाबतची सर्व तयारी पुर्ण झाली आहे. काही गोष्टींची तयारी सुरू आहे. गेल्या 10 वर्षात भ्रष्टाचारा विरोधात जी कारवाई पाहीली ती म्हणजे एक ट्रेलर होता. खरी अॅक्शन या पुढच्या काळात पाहायला मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा - महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं, सांगली-भिवंडीचा तिढाही सुटला
काँग्रेसवर मोदींचा हल्लाबोल
पंतप्रधान मोदींनी यावेळी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. जिथं जिथं काँग्रेस सरकार आहे तिथं तिथं विकास होवूच शकत नाही. काँग्रेसला ना गरीबांची पर्वा आणि ना वंचिताची. जनतेचा पैसा लुटणे हा त्यांचा खानदानी अधिकारी आहे असा हल्लाबोल मोदींनी केला. मात्र त्यांच्या लुटीच्या दुकानाचं शटर आपण बंद केल्याचंही त्यांनी आवर्जून यावेळी सांगितलं. त्यामुळे त्यामंडळींचा आपल्यावर राग आहे.
हेही वाचा - दोन राजे एकत्र...उदयन राजेंची शपथ... जाहीर मेळाव्यात काय झालं?
ते नामदार मी कामदार
काँग्रेसच्या काळात 1 रुपया विकासासाठी पाठवला तर त्यातले केवळ 15 पैसेच पोहोचत होते. बाकीचे पैस मध्येच गायब होत होते. त्या पैशांवर कोणता पंजा हात मारत होता हे सर्वांना माहित आहे. त्याचाही आपण बंदोबस्त केल्याचं मोदी म्हणाले. आपल्यावर ते टिका करतात ते नामदार आहेत. पण मी कामदार आहे असंही मोदींनी स्पष्ट केलं. देशाला अजून पुढे घेवून जायचं आहे. 2047 पर्यंत देशाला विकसीत करायचं आहे. मी गोरगरीबांसाठी उभा आहे. त्यांच्या कल्याणासाठी झटणार आहे. दरम्यान इंडीया आघाडीबाबतही त्यांनी वक्तव्य केलं आहे. घमंडीया गठबंधन मला शिव्या देतात. पण ते जेवढा चिखल माझावर उडवतील तेवढं जास्त कमळ देशात उगवेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.