अयोध्येतील भव्य राम मंदिरानंतर आता बिहारमधील सीतामढी येथे सीता मंदिराचे (Sita Mandir) बांधकाम सुरू होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीतामढी येथील पुनौरा धाममध्ये 8 ऑगस्ट रोजी भूमिपूजन करणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी सीता मंदिराच्या कामाला सुरुवात करणे हे भाजपचे मोठे पाऊल मानले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 7 आणि 8 ऑगस्ट रोजी बिहार दौऱ्यावर असतील. त्यानंतर राम मंदिरानंतर सीता मंदिर हा भाजपचा अंजेंडा असल्याची राजकीय वर्तूळात चर्चा आहे.
13 मार्च 2025 रोजी अहमदाबाद येथे आयोजित "शाश्वत मिथिला महोत्सव 2025" मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घोषणा केली होती. त्यावेळी ते म्हणाले होती की राम मंदिर तयार झाले आहे. आता सीतामढीमध्ये भव्य सीता मंदिराच्या उभारणीची वेळ आली आहे. त्यानंतर बिहार सरकारने पुनौरा धामच्या विकासासाठी 882 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली होती. त्यानुसार आता या मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे.
माता सीतेचे जन्मस्थान मानले जाते
पुनौरा धाम हे माता सीतेचे जन्मस्थान मानले जाते. बिहार सरकार आणि रामायण सर्किट उपक्रमांतर्गत पुनौरा धामला अयोध्याच्या धर्तीवर विकसित करण्याची योजना आहे. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल.
- भव्य मंदिर परिसर
- परिक्रमा पथ
- सीता कुंड (तलाव)
- सीता वाटिका
- लव-कुश वाटिका
- मेडिटेशन हॉल
- पार्किंगची जागा
Saiyaara Box Office: सैयाराने रचला इतिहास, कोणत्याही स्टार किडची सर्वात मोठी ओपनिंग, केले 7 रेकॉर्ड
सीतामढीच्या विकासाच्या दिशेने मोठे पाऊल
सध्या येथे जानकी स्थान आणि प्राचीन जानकी जन्मस्थळी मंदिर आहे. ते या ठिकाणाचे धार्मिक महत्त्व दर्शवते. हा प्रकल्प अयोध्याच्या धर्तीवर धार्मिक पर्यटनाच्या दिशेने सीतामढीचा विकास करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. यासोबतच, हे बिहारमधील सांस्कृतिक गौरव वाढवण्यासोबतच निवडणूक रणनीतीचा एक भाग देखील मानला जात आहे. आता याचा निवडणुकीच्या राजकारणात भाजपला किती फायदा मिळवून देणार हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.