जाहिरात

'अदिना मशीद नाही..हे तर आदिनाथ मंदिर', भाजपने युसूफ पठाणला दिलं थेट उत्तर, व्हायरल पोस्टमुळे खळबळ!

'अदिना मशीद नाही..हे तर आदिनाथ मंदिर', भाजपने युसूफ पठाणला दिलं थेट उत्तर,  व्हायरल पोस्टमुळे खळबळ!
Yusuf Pathan Latest Twitter Post
मुंबई:

BJP vs Yusuf Pathan Twitter Viral Post :  तृणमुलचे खासदार आणि भारताचा माजी क्रिकेटर युसूफ पठाणची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. पठाण यांनी पश्चिम बंगालमधील मालदामध्ये असलेल्या एका मशिदीला नुकतीच भेट दिली. त्यानंतर पठाण यांनी या मशिदीचे फोटो आणि व्हिडीओ एक्सवर पोस्ट केले. पण या पोस्टमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. कारण भाजपने युसूफ पठाणवर निशाणा साधला आहे. ती अदिना मशीद नसून ते आदिनाथ मंदिर आहे, असं भाजपने एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसच अन्य एका एक्स यूजरनेही हे आदिनाथ मंदिर असल्याचं ट्वीट केलं आहे.

युसूफ पठाण यांनी अदिना मशिदीबाबत काय म्हटलं?

पश्चिम बंगालमधील मालदामध्ये असलेली ऐतिहासिक अदिना मशीद 14 व्या शतकात बांधण्यात आली. सुल्तान सिकंदर शाह यांनी ही मशीद बांधली. सिंकदर शाह इल्यास राजघराण्यातील दुसरे शासक होते. या मशीदीचं बांधकाम 1373-1375 या कालावधीत करण्यात आले. भारतीय उपखंडातील सर्वात मोठी मशीद आहे. ही मशीद वास्तुशिल्पाचं एक जबरदस्त उदाहरण आहे, असं युसूफ पठाण यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे.

नक्की वाचा >> थांबा जरा..तुम्हीही GPS चा वापर करून वाहन चालवताय? Google मॅपने चालकाला दाखवला सर्वात खतरनाक रस्ता

दरम्यान, पठाण यांची पोस्ट व्हायरल होताच इंटरनेटवर शीतयुद्ध सुरु झालं आहे.अनेक यूजर्सने या पोस्टबाबत वेगवेगळी मतं मांडली आहेत. व्हीआर नावाच्या एका यूजरने तर चक्क ग्रोक एआयलाच याबाबत विचारलं आहे.तसच प्लॅन एच नावाच्या यूजरनेही रिट्वीट करत युसूफ पठाण यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

इथे पाहा युसूफ पठाण यांची ट्वीटर पोस्ट 

या पोस्टमध्ये या यूजरने म्हटलंय, प्रिय युसूफ पठाण, तुम्ही एका मोठ्या हिंदू मंदिर परिसरात उभे आहात. हे आदिनाथ मंदिर इस्लामी आक्रमकांनी त्याची पवित्रता दूर केली होती. तसच त्यांनी या मंदिरावर ताबाही मिळवला होता. तुमच्या माहितीसाठी काही फोटो शेअर केले आहेत. अन्याय आणि चुकीच्या गोष्टींना दूर करण्याची ही वेळ आहे. यामुळे मंदिरांचे पावित्र्य पुन्हा प्रस्थापित होईल, असंही या यूजरने म्हटलं आहे. पश्चिम बंगाल भाजपनेही युसूफ पठाणच्या पोस्टवर निशाणा साधलाय. हे सुधारणा-आदिनाथ मंदिर असल्याचं भाजपने म्हटलं आहे. युसूफ पठाण यांच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर वादंग निर्माण झालं आहे. या पोस्टला आतापर्यंत 70 लाखांहून जास्त लोकांनी रि-ट्वीट केलं आहे. 

नक्की वाचा >> Funny Video : 'अभ्यास केला नाही तर काय होईल?', चिमुकलीनं उत्तर देताच शाळेतील मॅडम कोमात अन् विद्यार्थी जोमात

Listen to the latest songs, only on JioSaavn.com