भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनोरंजन कालियाच्या यांच्या घराबाहेर स्फोटाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री रात्री 1.15 वाजेच्या सुमारास पंजाबमधील जालंधर येथे ही घटना घडली. स्फोट इतका मोठा होता दूरवर त्याचा आवाज गेला आणि लोकांमध्येही घबराट पसरली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मनोरंजन कालिया यांच्या घराबाहेर झालेला स्फोट कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु घराच्या अंगणात काही वस्तू फेकण्यात आली होती. ज्यामुळे दरवाजे, कारच्या खिडक्या इत्यादी फुटल्या. घराच्या अंगणात उभ्या असलेल्या मोटारसायकलसह इतर अनेक वस्तूंचे नुकसान झाले आहे. पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू आहे.
(नक्की वाचा- Political news: राहुल -कन्हैयाची जोडी बिहारच्या मैदानात, काँग्रेसचा प्लॅन काय?)
माजी कॅबिनेट मंत्री मनोरंजन कालिया यांनी याबाबत म्हटलं की, "जेव्हा स्फोट झाला तेव्हा मी झोपलो होतो. स्फोटानंतर मला सांगण्यात आले की बाहेर स्फोट झाला आहे. मला आवाज ऐकू आला, पण मला वाटले की ट्रान्सफॉर्मरमध्ये काहीतरी बिघाड झाला असावा. यानंतर मी पोलिसांना कळवले आणि आता पोलीस कारवाई करत आहेत." राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीबद्दल विचारले असता, मनोरंजन कालिया म्हणाले की, "राज्यातील परिस्थिती कोणापासूनही लपलेली नाही."
(नक्की वाचा : मंगेशकर हॉस्पिटलचा निर्दयीपणा! तनिषा भिसेंंच्या मृत्यूला जबाबदार कोण? अहवालात धक्कादायक खुलासा)
मनोरंजन कालिया यांच्या एका समर्थकाने सांगितले की, "माजी मंत्र्यांचे घर सुरक्षित नसते, तेव्हा शहरातील सामान्य लोकांच्या सुरक्षिततेची परिस्थिती काय असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती खूपच वाईट आहे. नेत्यांच्या घरांवर असे हल्ले होत आहेत. भाजपने अनेक त्याग करून शांतता प्रस्थापित केली होती. पण आता वातावरण झपाट्याने बिघडत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे."