जाहिरात

Political news: राहुल -कन्हैयाची जोडी बिहारच्या मैदानात, काँग्रेसचा प्लॅन काय?

काँग्रेसमध्ये झालेले हे बदल आरजेडीच्या सांगण्यावरून झाले आहेत. कारण गेल्या निवडणुकीत काँग्रेस चांगली कामगिरी करू शकली नाहीत. त्यामुळे महागठबंधनला थोडक्यात सत्तेपासून दुर रहावं लागलं होतं, असं पत्रकार सतीश सिंह सांगतात.

Political news:  राहुल -कन्हैयाची जोडी बिहारच्या मैदानात, काँग्रेसचा प्लॅन काय?
पाटणा:

बिहार विधानसभेच्या निवडणुका या तोंडावर आहेत. अशा वेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारकडे लक्ष दिले आहे. गेल्या तीन महिन्यात राहुल हे तिसऱ्यांदा बिहारच्या दौऱ्यावर आले होते. सोमवारी ते पाटण्यात आले होते. त्यानंतर ते बेगूसराय इथे स्थलांतर थांबवा, नोकरी द्या या यात्रेत सहभागी झाले. ही यात्रा कन्हैया कुमारच्या नेतृत्वाखाली काढली जात आहे. या रॅलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यानंतर ते पाटण्यात श्रीकृष्ण मेमोरिय हॉलमध्ये झालेल्या संविधान सन्मान संमेलनातही सहभागी झाले. काँग्रेसने जी रणनिती आखली आहे, त्यानुसार पक्षाला खरोखर बिहारमध्ये फायदा होवू शकतो का? बिहारच्या राजकारणाची गणितं काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काँग्रेसने सर्वात आधी संघटना बांधणीवर लक्ष दिलं. त्यातून बिहारचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश प्रभारी बदलण्यात आले. राजेश राम यांना बिहारचे नवे प्रदेशाध्यक्ष केले गेले. ते दलित समाजातील आहेत. तर मोहन प्रकाश यांच्या जागी युवा नेता कृष्णा अल्लावरू यांनी प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलं. या शिवाय विद्यार्थ्यांच्या राजकारणातून संसदीय राजकारणात आलेले कन्हैया कुमार यांना ही काँग्रेसने सक्रीय केले. त्यांच्या माध्यमातून सध्या 'पलायन रोको, नौकरी दो यात्रा' सुरू करण्यात आली आहे. 

ट्रेंडिंग बातमी : मंगेशकर हॉस्पिटलचा निर्दयीपणा! तनिषा भिसेंंच्या मृत्यूला जबाबदार कोण? अहवालात धक्कादायक खुलासा

कन्हैया यांची 'पलायन रोका, रोजगार दो'यात्रा सुरू आहे. या यात्रेला राहुल गांधींनी हजेरी लावली. त्यामुळे कन्हैया यांचेही मनोबल उंचावले असणार. बेगूसराय हा कन्हैया यांचा जिल्हा आहे. 2019 ची निवडणूक ते याच मतदार संघातून लढले होते. पण त्यांचा पराभव झाला होता. तर 2024 ची निवडणूक ते दिल्लीतून लढले होते. पण तिथेही त्यांच्या पदरी पराभव आला. मात्र बिहारमध्ये ज्या पद्धतीने कन्हैया सक्रीय झाले आहेत ते पाहात त्यांना विधानसभेची निवडणूक लढवण्यास सांगितले जावू शकते. याची दोन कारणं समोर आली आहेत. एक तर ते युवा आहेत आणि दुसरं म्हणजे ते ज्या जातीचं प्रतिनिधित्व करतात त्यांचा बिहार मधील टक्का आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Tanisha Bhise : मंगेशकर रुग्णालयाच्या डॉ. केळकरांची कोंडी, पत्रकार परिषदेतून घेतला काढता पाय, नक्की काय घडलं?

काँग्रेस बिहारमध्ये महागठबंधनमध्ये आहे. यात राष्ट्रीय जनता दल आणि डावे पक्ष ही आहेत. पण काँग्रेस बिहारमध्ये आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच त्यांनी प्रदेश पातळीवरच्या नेतृत्वात मोठे बदल केले. आधी प्रभारी बदलले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष ही बदले. अखिलेश प्रसाद सिंह हे आधी प्रदेशाध्यक्ष होते. ते लालू प्रसाद यादव यांच्या जवळचे होते. आरजेडीतून ते काँग्रेसमध्ये आले होते. त्यामुळे त्यांना आता बाजूला करण्यात आले आहे. तर कट्टर काँग्रेसी म्हणून ओळख असलेले राजेश राम यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे. तर दुसरीकडे शकील अहमद खान यांनी काँग्रेसने विधीमंडळ पक्षाचा नेता केलं आहे. त्यामुळे काँग्रेसने मोठ्या प्रमाणात असलेल्या दलीत आणि मुस्लीम समाजाला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Dhule News: धुणंभांडी करणाऱ्या महिलेच्या घरी चोरी, चोरांच्या हाताला काय लागलं?

काँग्रेसमध्ये झालेले हे बदल आरजेडीच्या सांगण्यावरून झाले आहेत. कारण गेल्या निवडणुकीत काँग्रेस चांगली कामगिरी करू शकली नाहीत. त्यामुळे महागठबंधनला थोडक्यात सत्तेपासून दुर रहावं लागलं होतं, असं पत्रकार सतीश सिंह सांगतात. त्यामुळेच काँग्रेस स्वत: ला मजबूत करत आहे. जेणे करून विधानसभेत त्यांची कामगिरी चांगली होईल. काँग्रेस कार्यकर्त्यांना आता कार्यक्रम देत आहे. कार्यकर्त्यांना सक्रीय करत आहे. त्यातून जागा वाटपातही काँग्रेस आपली दावेदारी करू शकेल अशी रणनिती आहे. त्यातून जास्त जागा पदरात पाडता येतील. काँग्रेसने संघटनेत बदल ही केले आहेत. संघटना लोकांचे प्रश्न घेवून रस्त्यावर ही आहे. याचा फायदा आता जरी झाला नाही तरी भविष्यात त्याचा फायदा होवू शकतो असंही ते सांगतात. 

ट्रेंडिंग बातमी - Health News: हेडफोन्सचा अति वापर कानांसाठी किती घातक? काय आहेत दुष्परिणाम? ही बातमी नक्की वाचा

बिहारमध्ये काँग्रेसची तशी ताकद नाही. स्थानिक नेते आणि मित्र पक्षाच्या जोरावर काँग्रेस बिहारमध्ये तग धरून आहे. मात्र ही परिस्थिती पक्षाला बदलायची आहे. त्यामुळेच काँग्रेसची नजर दलीत, अती मागास, आणि मुस्लिम मतदारांवर आहे. दलितांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी काँग्रेसने संविधान आणि आरक्षणाचा मुद्दा घेतला आहे. मुस्लीमांनाही काँग्रेस आपल्या बाजून करण्याच्या प्रयत्नात आहे. वक्फ बीला वेळी ही काँग्रेसने त्याला मोठा विरोध केला होता. संसदेत आणि संसदे बाहेर ही हा विरोध दिसला. त्याच थेट फायदा काँग्रेसला बिहार विधानसभा निवडणुकीत होताना दिसत आहे. दलित आणि मुस्लीमांचे नेतृ्त्व करेल असा एक ही पक्ष सध्या नाही. त्यामुळे ते काँग्रेसकडे आशेने पाहात आहेत. अती मागास समाज जवळपास 37 टक्के बिहारमध्ये आहे. त्यात राजदची भूमीका ही महत्वाची ठरणार आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: