जाहिरात

'Blue Drum' Murder Case: मुलीचा बाप नेमका कोण ? निळ्या ड्रममध्ये पतीला पुरणाऱ्या मुस्कानला मुलगी झाली

'Blue Drum' Murder Case: योगायोग असा की सौरभचा जन्म ज्या तारखेला झाला होता त्याच तारखेला मुस्कानला मुलगी झाली आहे.

'Blue Drum' Murder Case: मुलीचा बाप नेमका कोण ? निळ्या ड्रममध्ये पतीला पुरणाऱ्या मुस्कानला मुलगी झाली
नवी दिल्ली:

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये सौरभ राजपूत याच्या हत्येमुळे संपूर्ण देश हादरला होता. सौरभची निर्घृणपणे हत्या करून त्याचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये पुरण्यात आला होता. सौरभची हत्या त्याची बायको मुस्कान आणि तिचा प्रियकर साहील शुक्ला यांनी मिळून परदेशात नोकरीला असलेल्या सौरभला ठार मारलं होतं. सौरभच्या हत्येला 8 महिने 21 दिवस झाल्यानंतर मुस्कान पुन्हा आई झाली आहे. योगायोग असा की सौरभचा जन्म ज्या तारखेला झाला होता त्याच तारखेला मुस्कानला मुलगी झाली आहे. मात्र ही मुलगी सौरभची का साहिलची हे अद्याप कळू शकलेलं नाही. डीएनए चाचणीनंतरच याचा उलगडा होऊ शकेल. 

नक्की वाचा: मैत्री आधी, क्रिकेट नंतर..स्मृती मंधानाच्या दु:खद काळात जेमिमा रॉड्रिग्जने घेतला सर्वात मोठा निर्णय

मुस्कानची रवानगी विशेष कोठडीत

रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मुस्कानची आणि तिच्या मुलीची रवानगी मेरठ तुरुंगातील विशेष कोठडीत करण्यात आली आहे. या दोघींना 12A या बराकीत ठेवण्यात आलं आहे. या मुलीच्या डीएनए चाचणीची अद्याप कोणतीही मागणी करण्यात आली नसल्याचं तुरुंग प्रशासनाने म्हटलं आहे. या बराकीत नवमातांना ठेवण्यात येते. इथे मुस्कानसह 21 महिला कैदी आणि तीन मुलं आहेत. मुस्कान आई झाल्यानंतर तिला कोणीही भेटायला आलेले नाही. मुस्कानचे आईवडील प्रमोद रस्तोगी आणि कविता हे तिची पहिली मुलगी पिहूचा सांभाळ करत आहे. तेही मुस्कानला भेटण्यासाठी गेले नाहीत. 

नक्की वाचा: नवऱ्याने प्रेयसीसोबतचे अश्लील फोटो दाखवले, सासू-नणंदेकडून भयानक छळ; नाशकात नवविवाहितेने टोकाचे पाऊल उचललं

नवऱ्याला ठार मारल्यानंतर प्रियकरासोबत मुस्कान फिरायला गेली

3 मार्च 2025 रोजी मेरठच्या ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरा कॉलनीत राहणाऱ्या मुस्कानने परदेशात काम करणाऱ्या तिच्या नवऱ्याला जेवणात गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं होतं. यानंतर साहिल शुक्लाच्या मदतीने तिने सौरभवर सपासप वार करत ठार मारलं. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या दोघांनी सौरभच्या शरीराचे तुकडे करून निळ्या रंगाच्या ड्रममध्ये भरले होते.यानंतर ड्रममध्ये सिमेंड भरून तो बंद केला होता. हत्या केल्याच्या दुसऱ्याच दिवशी मुस्कान आणि साहिल हिमाचल प्रदेशात फिरायला गेले होते. 17 मार्चला या हत्याकांडाचा उलगडा झाला होता.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com