जाहिरात

एकाच कुटुंबातील 5 जणाचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडले, पोलीस तपास सुरू

Bodies Found in Delhi: दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरालाल सुतार काम करायचे. वर्षभरापूर्वीच त्यांच्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. पोलिसांनी तपास केला असता अद्याप सुसाईड नोट मिळाली नाही.

एकाच कुटुंबातील 5 जणाचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडले, पोलीस तपास सुरू
दिल्ली में शव मिला

दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रंगपुरी परिसरात एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह संशयास्पद स्थितीत घरात सापडले आहेत. मृतांमध्ये वडील आणि चार मुलींचा समावेश आहे. मुलींची हत्या केल्यानंतर वडिलांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय हिरालाल रंगपुरी गावात भाड्याच्या घरात आपल्या कुटुंबासह राहत होते. पत्नीचा यापूर्वीच मृत्यू झाला होता. त्यानंतर हिरालाल हे 18 वर्षांची मुलगी नीतू, 15 वर्षांची निशी, 10 वर्षांची नीरू आणि 8 वर्षांची मुलगी निधी यांच्याकसोबत राहत होते. अपंगत्वामुळे चारही मुलींना चालता येत नव्हते. या सर्वांची काळजी घेण्याची जबाबदारी हिरालाल यांच्यावर होती. 

शुक्रवारी हिरालाल यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने ही घटना उघडकीस आली. शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करून घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती दिली. पोलिसांना घटनास्थळी दाखल होते दरवाजा उघडला त्यावेळी एका खोलीत हिरालाल यांचा मृतदेह बेडवर आढळून आला, तर दुसऱ्या खोलीत चारही मुलींचे मृतदेह आढळून आले.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरालाल सुतार काम करायचे. वर्षभरापूर्वीच त्यांच्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. पोलिसांनी तपास केला असता अद्याप सुसाईड नोट मिळाली नाही. मात्र मृत्यूचे कारण मुलींचे अपंगत्व असल्याचे मानले जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: