मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दाऊदी बोहरा समुदायाचा नेता म्हणून सैयदना मुफद्दल सैफुद्दीन यांचं पद कायम ठेवलं आहे. तर त्यांचा पुतणा ताहिर फखरुद्दीन याचा दावा फेटाळला आहे. फखरुद्दीनने दाऊदी बोहरा समुदायाचे 53 व्या धार्मिक नेता 'दाई-अल-मुतलबक' म्हणून सैयदना मुफद्दल सैफुद्दीनच्या पदाला आव्हान देत एक याचिका दाखल केली होती.
न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी सांगितलं की, मी दिलेला निर्णय यशासंभव तटस्थ ठेवला आहे. मी केवळ पुराव्यांच्या आधारावर निर्णय घेतला आहे, आस्थाच्या मुद्द्यावर नाही. हा वाद मुंबईतील शिया मुस्लीम समुदायाच्या नेतृत्वावर केंद्रीत आहे. यामध्ये आध्यात्मिक प्रमुख दाई अल-मुतलक यांच्या पदासाठी दोघे स्पर्धा करीत आहेत. जानेवारी 2014 मध्ये 52 मध्ये दाई, सैयदना मोहम्मद बुरहानुद्दी यांच्या मृत्यूनंतर काका-पुतण्याचा वाद समोर आल्यानंतर उत्तराधिकाऱ्यावरुन वाज सुरू झाला.
हे ही वाचा-वय वर्ष 99, महाकर्तव्य पार पाडले, दुसऱ्या क्षणाला प्राण सोडले, मतदाराच्या मृत्यूमुळे हळहळ
दाई यांच्या मृत्यूनंतर लगेचच त्यांचे भाऊ सैयदना खुजैमा कुतुबुद्दीन यांनी उत्तराधिकाऱ्याचा वाद सोडविण्यासाठी दिवंगत नेत्याचे पूत्र सैयदना मुफद्दल सैफुद्दीन यांना आमंत्रित केलं. मात्र या प्रकरणात सैयदना मुफद्दल सैफुद्दीन यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि स्वत:ला समुदाच्या 53 वे दाई म्हणून नियुक्त केलं. ज्यानंतर हा मोठा कायदेशीर वाद सुरू झाला.
दहा वर्षांपासून कायदेशीर कारवाई सुरू...
खुजैमा कुतुबुद्दीन यांनी एप्रिल 2014 मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली आणि 1965 मध्ये मरण पावलेले नेत्याद्वारे गुप्त नासाच्या आधारावर त्यांना समुदायाचा नेता घोषित करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितलं की, त्यांचे बंधू 52 वे दाई यांनी त्यांना सुरुवातील हे गुप्त ठेवण्यास सांगितलं होतं आणि नंतर सैयदना बुरहानुद्दीनद्वारे निष्ठेची शपथ घेतली. ज्यानंतर कुतुबुद्दीन यांना नेता म्हणून घोषित करण्यात आलं.
मात्र या सुनावणीदरम्यान कुतुबुद्दीन यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचा मुलगा सैयदना ताहेर फखरुद्दीन यांनी उच्च न्यायालयात एक अर्ज दाखल करीत या प्रकरणात वडिलांची जागा घेण्याची मागणी केली. फखरुद्दीन यांनी दावा केला की, त्याला वडिलांच्या नसची उपाधी दिली होती आणि त्यांनी 54 वे दाई असल्याचा दावा केला होता. प्रतिवादी, सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांनी युक्तिवाद केला की, कुतुबुद्दीनने दावा केल्याप्रमाणे आणि साक्षीदारांशिवाय 1965 चा निकाल स्वीकारला जाऊ शकत नाही. सैफुद्दीन यांच्या वकिलांनी दावा केला की, दाऊदी बोहरा आस्थाच्या स्थापित सिद्धांतांनुसार, नास बदलता येऊ शकतो आणि भूतकाळातील उदाहरणंदेखील दाखवले जाऊ शकतात.
न्यायमूर्ती गौतम पटेल 2014 पासून घोषणात्मक प्रकरणाची सुनावणी करीत आहे आणि अंतिम सुनावणी 30 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू झाली. याच्याशी धार्मिक आणि कायदेशीर गोष्टींचा संबंध असल्याने दाऊदी बोहरा समुदायासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. दाऊदी बोहरा शिया इस्लामअंतर्गत एक धार्मिक संप्रगा. आहे. जगभरात त्यांची लोकसंख्या साधारण दहा लाखांच्या जवळपास आहे आणि ते जगभरातील 40 हून अधिक देशांत वसलेले आहेत, ज्यापैकी अधिकांश समुदाय भारतात वास्तव्यास आहे.