- BSNL के डायरेक्टर विवेक बंसल के प्रयागराज दौरे के लिए 50 अधिकारियों को 20 अलग-अलग काम सौंपे गए थे
- आदेश में स्नान किट में अंडरगर्मेंट, चप्पल, कंघी, शीशा और बालों के तेल की व्यवस्था करने का निर्देश था
- विवेक बंसल के लिए संगम स्नान, नाव की सवारी, मंदिर दर्शन और होटल में खास इंतजाम का प्रावधान था
BSNL चे संचालक विवेक बंसल यांच्या प्रयागराज दौऱ्यासाठी जारी VIP प्रोटोकॉल पाहून खळबळ उडाली आहे. त्यांच्यासाठी अंडरवेयर, तेल, कंगवासारख्या वस्तू जमा करण्यासाठी ५० कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावली होती. हा आदेश व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी कडक कारवाई केली आणि अधिकाऱ्यांचा दौरा रद्द करण्यास सांगितला.
५० अधिकाऱ्यांना सोपवली २० कामं...
BSNL बोर्डाचे संचालक विवेव बंसल २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार होते. मात्र त्यांच्या या दौऱ्यासाठी जे अधिकृत आदेश आले ते हैराण करणारे होते. या रिपोर्टनुसार, बंसल यांच्या व्हिआयपी ट्रिटमेंटसाठी तब्बल ५० अधिकाऱ्यांना २० वेगवेगळी कामं सोपविण्यात आली होती. अधिकाऱ्यांना सोपविण्यात आलेल्या कामाचा आदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्नान किटमध्ये अंडरवेअर आणि चपलेची मागणी...
व्हायरल आदेशानुसार, प्रयागराजमध्ये पोहोचल्यानंतर बंसल यांच्यासाठी संगम स्नान, बोटीची व्यवस्था, बडे हनुमान, अक्षयवट आणि पातालपुरी मंदिरांच्या दर्शनासाठी खास व्यवस्था करण्याचं म्हटलं आहे. सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे आदेशमध्ये स्नान किटचा उल्लेख आहे. अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले होते की, या किटमध्ये टॉवेल, अंडरगार्मेंट, चपल, कंगवा, आरसा आणि केसांसाठी तेलाची बाटली देण्याच्या सूचना होत्या. इतकच नाही तर घाटावर वापरासाठी एक चादर आणि हॉटेल किंवा सर्किट हाऊसमध्ये त्यांच्यासाठी तसेच सुका मेवा, फळांची टोपली, शेव्हिंग किट, टूथपेस्ट, शॅम्पू इत्यादींची व्यवस्था करण्याचा आदेश देण्यात आले होते.

केंद्रीय मंत्र्यांचा संताप...
संचालकांचा हा आदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्र्यांनी या सर्व घटनेवर नाराजी व्यक्त केली असून हे अस्वीकार्य आणि हैराण करणारं असल्याचं म्हटलं. यावर तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. वाढता वाद लक्षात घेता विवेक बंसल यांचा प्रयागराज दौरा तातड़ीने रद्द करण्यात आला आहे. या VIP कल्चरवर सरकारने तीव्र भूमिका घेतली आहे. सरकारने BSNL चे अधिकारी विवेक बंसलला कारण दाखवा नोटीस जारी करीत सात दिवसांच्या आत उत्तर मागितलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world