जाहिरात

Plane Crash Video : विजयापुरात विमान कोसळलं! 'कसा' झाला हा थरारक अपघात? पाहा व्हिडीओ

कर्नाटकच्या विजयापूरामध्ये धक्कादायक घटना घडली.  विजयपूरा जिल्ह्यात एक हलके प्रशिक्षण विमान कोसळल्याची भयंकर घटना घडलीय. या अपघातात दोन वैमानिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Plane Crash Video : विजयापुरात विमान कोसळलं! 'कसा' झाला हा थरारक अपघात? पाहा व्हिडीओ
Vijayapura Training Aircraft Crash Video

सौरभ वाघमारे, प्रतिनिधी

Private Charter Plane Crash Video : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाल्यानं सर्वत्र खळबळ उडाली होती. या विमान अपघाताबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत असतानाच कर्नाटकच्या विजयापूरामध्ये धक्कादायक घटना घडली.  विजयपूरा जिल्ह्यात एक प्रशिक्षण विमान कोसळल्याची भयंकर घटना घडलीय. या अपघातात दोन वैमानिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कॅप्टन कुणाल मल्होत्रा आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक गौतम संकर अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावं आहेत.

विमानाचा अपघात नेमका कसा झाला?

रिपोर्टनुसार, विजयपूरा जिल्ह्यातील बबलेश्वर जवळ असलेल्या मंगळूरू गावाच्या परिसरात हे विमान जमिनीवर कोसळले. प्राथमिक माहितीनुसार,इंधन संपणे किंवा तांत्रिक बिघाड हे विमान अपघाताचे कारण असल्याचं समजते. या अपघातात सहाय्यक फ्लाइट इन्स्ट्रक्टर कॅप्टन कुणाल मल्होत्रा आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक गौतम संकर हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी बीएलडीई रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> Ajit Pawar Death : 'पायलटने Mayday कॉल दिला नाही,त्याला टेकऑफ नंतर..', विमान अपघाताचा नवा ट्वीस्ट समोर

वैमानिक प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या रेड बर्ड एव्हिएशन संस्थेचे हे प्रशिक्षण विमान कलबुर्गीहून बेळगावकडे जात असताना अपघातग्रस्त झाले.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहोचवले.सध्या जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com