
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 : भारतीय नौदलाचा (Indian Navy) जगातील बलाढ्य नौदलात समावेश होतो. देशाच्या तीन बाजूला सागरी सीमा आहे. या सीमेचं संरक्षण नौदलाचे सैनिक डोळ्यात तेल घालून करत असतात. पाकिस्तान विरुद्ध 1965 आणि 1971 साली झालेल्या युद्धातील विजयात नौदलाचं महत्त्वाचं योगदान होतं. या योगदानाला मानाचा मुजरा करण्यासाठी भारतीय नौदलाने 2022 साली आपला ध्वज बदलला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नौदलाच्या आधीच्या ध्वजावर सेंट जॉर्जेस क्रॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन लाल रेषा होत्या. ज्या ब्रिटिशांच्या राजवटीपासून कायम होत्या. गुलामीचे ती चिन्ह 2022 मध्ये मोदी सरकारनं बदलली. या ध्वजाचं डिझाईन हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलं आहे. भारतीय नौदलाचे जनक समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करण्यासाठीच नौदलाच्या ध्वजामध्ये शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेला ठळक स्थान देण्यात आले आहे.
( नक्की वाचा : Shivaji Maharaj : महाराजांचं जबरदस्त व्यवस्थापन; सैनिकांना भरमसाठ पगार, प्रतिपदेच्या पहिल्या दिवशी बोनसही! )
छत्रपती शिवाजी महाराज : भारतीय नौदलाचे जनक ( Chhatrapati Shivaji Maharaj, Father of Indian Navy)
भारताला मोठा सागरी किनारा आणि सागरी इतिहास लाभला आहे. देशांच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी नौदलाची गरज देशातील तत्कालीन राजांना समजण्यापूर्वीच महाराजांनी मराठ्यांचं आरमार उभं केलं होतं. त्यांनी फक्त सीमांचे रक्षण करण्यासाठीच नाही सागरी किनाऱ्यावर तर शक्ती आणि प्रभाव निर्माण करण्यासाठी हे आरमार उभारले.
शिवाजी महाराजांना आदिलशाह आणि मुघलांसोबतच पोर्तुगिज आणि सिद्दी यांच्याशी सामना करावा लागला. कोकणाील समुद्र किनाऱ्यावर प्रबळ असलेल्या पोर्तुगीज आणि सिद्दीचा बंदोबस्त करण्याचे काम महाराजांच्या आरमारानं केलं. महाराजांच्या आरमारात 5 हजार सैनिक होते.
( नक्की वाचा : Shivaji Maharaj : राज्यभिषेकावेळी महाराजांची केली होती सुवर्ण तूला, या 16,000 सोन्याच्या होनचं पुढे काय झालं? )
शिवाजी महाराजांनी जहाज निर्मितीकडंही लक्ष दिलं. सागरी युद्धाही नव्या तंत्रानं लढत बलाढ्य शत्रूंना जेरबंद केलं. जहाज बांधणीवर लक्ष दिलं. समुद्राचं सामरिक महत्त्व ओळखून सिंधुदूर्ग आणि विजयदुर्ग या प्रमुख सागरी किल्ल्यांची निर्मिती केली. शिवाजी महाराजांच्या सागरी सामर्थ्याचा हे किल्ले पुरावे आहेत. स्वराज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रत्येक हलचालींवर नियंत्रण आणि लक्ष ठेवण्यासाठी हे किल्ले महत्त्वाचे होते.
आपले नौदल अद्यावत शस्त्रांनी सज्ज असावे, यावर शिवाजी महाराजांचा भर होता. त्यांनी आपल्या सैन्याला युद्धसज्ज ठेवले. शिवाजी महाराजांची जमिनीवरील युद्धनिती गनिमी काव्यावर आधारित होती. त्यांचे आरमार ही चपळ आणि शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी प्रसिद्ध होते. कान्होजी आंग्रे सारख्या कर्तबगार मराठा सरदाराकडं त्यांनी आरमाराची जबाबदारी दिली. आंग्रे असेपर्यंत कोकण किनारपट्टीवर इंग्रज कधीही शिरजोर झाले नाहीत.
सागरी किनाऱ्याच्या संरक्षणचा महत्त्व आणि त्या मार्गावरुन होऊ शकणारा परकीय आक्रमणाचा धोका ओळखणारे आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी बलाढ्य आरमाराची निर्मिती करणारे मध्ययुगातील पहिले भारतीय राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या या योगदानासाठीच त्यांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world