जाहिरात

सातासमुद्रापार डंका! इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, कधी-कुठे? वाचा सविस्तर

Chhatrapati Shivaji Maharaj News: भारत-इस्रायल मैत्रीचे नवे प्रतीक म्हणून इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आणि स्मारक उभारले जाणार आहे.

सातासमुद्रापार डंका! इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, कधी-कुठे? वाचा सविस्तर
"Chhatrapati Shivaji Maharaj News: छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाणार"
Canva
  • इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आणि स्मारक उभारण्याचा निर्णय
  • हा प्रकल्प भारत-इस्रायल सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक असल्याची घोषणा
  • इस्रायलमधील महानगरपालिकांसोबत योग्य जागा शोधून तो उभारला जाईल: मुंबईतील इस्रायलचे Consul General
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

Chhatrapati Shivaji Maharaj News: भारत आणि इस्रायलमधील वाढत्या सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक म्हणून इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा तसेच स्मारक उभारले जाणार आहे. मुंबईतील इस्रायलचे Consul General यानिव रेवाच यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दोन्ही देशांतील जनतेला जोडणाऱ्या या ऐतिहासिक उपक्रमांतर्गत शिवाजी महाराजांवरील पुस्तकाचे हिब्रू भाषेत भाषांतर करू शकतो, यावरही विचार केला जात आहे. 

इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि स्मारक स्थापित केले जाणार आहे. याविषयी इस्रायलचे Consul General यानिव रेवाच (Yaniv Revach) यांनी 'आयएएनएस' (IANS) या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, इस्रायलमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा भारत-इस्रायल मैत्रीचे प्रतीक असेल. याशिवाय त्यांनी लेबनॉनकडून होणाऱ्या हल्ल्यांविरोधात इस्रायलच्या सुरक्षा कारवाईचे समर्थन केले.

प्रश्न: तुम्ही येथे आल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत काय शिकलात?

उत्तर: जेव्हा मी काही महिन्यांपूर्वी येथे आलो, तेव्हा मला भारताचा इतिहास जाणून घ्यायचा होता. आपला इतिहास खूप मिळताजुळता आहे आणि आमच्यासोबतही अगदी तसेच घडले आहे, हे जाणून मला खरोखरच खूप आनंद झाला आणि मी प्रभावित झालो. जोपर्यंत आम्हाला आमची जमीन मिळाली नाही आणि आम्ही आमचे स्वतःचे राज्य निर्माण करण्यात यशस्वी झालो नाही, तोपर्यंत ज्यूंना(Jews) देशासाठी अनेक दशके लढावे लागले.

गेल्या फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यानंतर, आम्ही निर्णय घेतला की आम्ही येथे भारतात एका मोठ्या प्रकल्पाचे उद्घाटन करू. आम्हाला आमच्या दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी काही बजेट मिळाले. इस्रायली आणि भारतीय लोकांमध्ये केवळ एक नियमित सांस्कृतिक उपक्रम राबवण्याऐवजीआम्ही अशी काहीतरी कल्पना केली जी अधिक प्रमाणात एक 'गुडविल प्रोजेक्ट' (सदिच्छा प्रकल्प) असेल. म्हणूनच आम्हाला प्रत्यक्षात भारतीय हीरो छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तयार करून तो इस्रायलला पाठवण्याची कल्पना सुचली.

हे इस्रायल आणि भारतातील लोकांमधील मैत्री आणि प्रेरणेचे दीर्घकाळ टिकणारे प्रतीक ठरणार आहे. या विचाराविषयी आम्ही प्रत्यक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाला देखील कळवले. ते त्वरित मला भेटण्यासाठी तयार झाले. एवढेच नाही तर त्यांनी मला सांगितले की ते आमच्या या सुंदर प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी आणि आम्हाला आवश्यक असणारी प्रत्येक मदत करण्यासाठी तयार आहेत.

प्रश्न : इस्रायलमधील पुतळा आणि जागा कशी असेल? इस्रायल सरकार इस्रायलमध्ये शिवाजी महाराजांच्या संस्कृतीचा कशा प्रकारे प्रचार करण्याचा विचार करत आहे?

उत्तर: गोष्ट फक्त अशी नाही की आम्ही पुतळा घेऊन जाऊ; आम्ही एका खूप चांगल्या कलाकाराचा (आर्टिस्ट) शोध घेऊ. आम्ही एक खूप चांगला पुतळा तयार करू. आम्ही तो इस्रायलला पाठवू. आम्ही इस्रायलमधील काही महानगरपालिकांसोबत मिळून चाचपणी करत आहोत की आम्ही हा पुतळा कुठे उभारू शकतो. ही अशी गोष्ट आहे जी इस्रायली लोकांनीही भारताच्या इतिहासाबद्दल शिकली पाहिजे. याव्यतिरिक्त आम्ही असाही विचार करत आहोत की, आम्ही शिवाजी महाराजांवरील पुस्तकाचे हिब्रू भाषेत भाषांतर करू शकतो का, जेणेकरून लोक त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेऊ शकतील.

(नक्की वाचा : Kolhapur News: अंबाबाई मंदिराला सोन्याचा साज! गोव्यातील भक्ताकडून दीड किलो सोन्याचा कळस अर्पण; किंमत तब्बल...)

प्रश्न: सुरुवातीपासूनच आपण भारत आणि इस्रायलची मैत्री पाहिली आहे. संरक्षण असो, ऑटोमोबाइल असो की इतर कोणतेही क्षेत्र, अनेक क्षेत्रांत भारत आणि इस्रायल मिळून योगदान देत आहेत. पण आता आपण जगासोबत आपली सांस्कृतिक मूल्ये शेअर करत आहोत. यामुळे ग्लोबल लीगला कसा फायदा होईल आणि हे जगाला एक चांगली ओळख कशी देईल?

उत्तर: मला वाटते की, मी म्हटल्याप्रमाणे हा लोकांचा लोकांशी जोडणारा (पीपल टू पीपल) प्रकल्प आहे आणि आमच्यासाठी, माझ्या दृष्टिकोनातून, आम्ही असा प्रकल्प करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुन्हा सांगतो, हा केवळ एक रेग्युलर कल्चरल प्रोजेक्ट, डिफेन्स प्रोजेक्ट, सायबर, एआय (AI) इत्यादी नाही. हे असे काहीतरी आहे जे प्रत्यक्षात लोकांच्या हृदयाशी जोडलेले आहे, विशेषतः भारतातील लोकांच्या. माझ्या दृष्टीने हा आदर देणे आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. आपण सर्वच येथे भारतात या हीरोचा अभिमान बाळगतो. म्हणूनच मला वाटते की इस्रायलमध्येही त्यांच्या मूल्यांचे स्मरण करणे अत्यंत मूलभूत असेल.

(Content Source IANS)
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com