जाहिरात
This Article is From Apr 10, 2024

छत्तीसगडमध्ये खोल दरीत बस कोसळून भीषण दुर्घटना, 12 जणांचा मृत्यू

Chhattisgarh Bus Accident: छत्तीसगडमध्ये खोल दरीत बस कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. अपघातामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

छत्तीसगडमध्ये खोल दरीत बस कोसळून भीषण दुर्घटना, 12 जणांचा मृत्यू
छत्तीसगडमध्ये दुर्ग जिल्ह्यात खोल दरीत बस कोसळून भीषण अपघात

Chhattisgarh Bus Accident: छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यामध्ये (Chhattisgarh Durg Accident) झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. तर 15 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात झालेल्या बसमध्ये केडिया डिस्टिलरी फॅक्टरीचे (Kedia Distilleries) 40 कर्मचारी होते. कुम्हारी येथे 50 फूट खोल दरीमध्ये बस कोसळल्याने ही दुर्घटना घडली. 

मंगळवारी (9 एप्रिल 2024) रात्री काम करून कर्मचारी घरी परतत असताना काळाने घाला घातला. या दुर्घटनेत 12 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखले व त्यांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. रात्री उशीरापर्यंत बचावकार्य सुरू होते.

(लोकसभा निवडणूक 2024 होणार 'International'; या देशांतील राजकीय पक्षांना भाजपकडून आमंत्रण)

धक्कादायक माहिती समोर 

छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा जखमींची भेट घेण्यासाठी रात्री उशीरा रायपूर एम्समध्ये पोहोचले होते. दरी कोसळलेल्या बसमधील एकही दिवा सुरू नव्हता, अशी धक्कादायक माहिती जखमींनी उपमुख्यमंत्री शर्मा यांना दिली.  दरम्यान अपघाताची गांभीर्याने चौकशी करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री शर्मा यांनी सांगितले. अपघातामध्ये जखमी झालेल्या 15 जखमींवर रायपूर आणि दुर्गमधील हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरू आहेत. यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. 

('तिसऱ्यांदा सत्तेत येणार, पहिल्या 100 दिवसात मोठे निर्णय घेणार', मोदींचा प्लॅन काय?)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक 

दुर्गमधील बस दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी म्हटले की, "छत्तीसगडच्या दुर्गमध्ये झालेला बस अपघात अतिशय दुःखद आहे. यामध्ये ज्यांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले आहे, त्यांच्याप्रति मी शोक व्यक्त करतो. तसेच जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी मी प्रार्थना करतो.” 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या छत्तीसगडमधील बस दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी 'X' वर पोस्ट करत म्हटले की, "छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या बस अपघातामध्ये झालेल्या अनेकांच्या मृत्यूची बातमी अतिशय दुःखद आहे. जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी मी प्रार्थना करते.”

(अरविंद केजरीवालांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली; काय आहे दिल्लीतील मद्य घोटाळा?)

बस दरीमध्ये कोसळून 12 जणांचा मृत्यू  

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यामध्ये कर्मचाऱ्यांनी भरलेली बस खोल दरीमध्ये कोसळून भीषण अपघात झाला आहे. मंगळवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. खपरी गावाजवळ पोहोचल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस 50 फूल खोल दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करत जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीस घटनास्थळी अंधार असल्याने बचावकार्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. सध्या अपघातग्रस्त बस दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com