- सांताक्लॉज हे काल्पनिक नसून सेंट निकोलस नावाच्या ऐतिहासिक व्यक्तीशी संबंधित आहेत
- सेंट निकोलस त्यांना अमेरिकेतील डच लोकांनी सांता क्लॉज नावाने ओळखले
- सेंट निकोलस यांचे निधन ६ डिसेंबर ३४३ मध्ये झाले, पण त्यांची दानशूर वृत्ती आणि परंपरा आजही चालू आहे
Christmas Day 2025: ईसा मसीहांचा जन्म आणि सांताची परंपरा याची नेहमी चर्चा होते. जगभरात सध्या ख्रिसमस म्हणजेच नाताळच्या उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. भारतासह जगभरातील चर्चमध्ये 25 डिसेंबरला मोठ्या उत्साहात प्रार्थना सभांचे आयोजन केले जाते. याच दरम्यान सांता क्लॉज रात्री येऊन मुलांना भेटवस्तू देऊन जाईल, या श्रद्धेमुळे मुलांमध्ये कमालीची उत्सुकता असते. पण सांता क्लॉज खरोखर कोण होते, याबाबतची ऐतिहासिक माहिती अतिशय रंजक आहे. त्यामुळे खरोखर सांताक्लॉज असतो का? तो कोण असतो? त्या मागचा इतिहास काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
खऱ्या आयुष्यातील सांता सांता क्लॉज हे केवळ काल्पनिक पात्र नसून, त्यांचा संबंध ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाशी आहे. त्यांचे खरे नाव 'सेंट निकोलस' होते. त्यांचा जन्म 280 ईसवी मध्ये तुर्कमेनिस्तानच्या मायरा शहरात झाला होता. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतरही त्यांनी आपला देवावरील विश्वास ढळू दिला नाही. पुढे ते चर्चमध्ये पादरी आणि त्यानंतर बिशप झाले. त्यांच्या पत्नीचे नाव क्लॉज होते. त्यांच्या पत्नीला लहान मुलांनी गिफ्ट देणं आणि त्यांसोबत वेळ घालवणं तिला आवडायचं. त्यामुळे सांताक्लॉज रात्री काळोखात आपली ओळख लपवून लहान मुलांना गिफ्ट देण्यासाठी जात असत.
निकोलस यांना सांताक्लॉज हे नाव त्यांच्या गिफ्ट वाटण्याच्या सवई मुळे मिळाले. अमेरिकेत डच लोकचरित्र 'सिंटरक्लॉस' नुसार त्यांना हे नाव मिळाले आहे. सेंट निकोलस यांना मुलांवर अत्यंत प्रेम होते. ते आपली ओळख लपवून गरजू मुलांना आणि गरिबांना रात्रीच्या वेळी गुप्तपणे भेटवस्तू द्यायचे. त्यांच्या याच सवयीमुळे त्यांना अमेरिकेतील 'सिंटरक्लॉस' या डच पात्रावरून 'सांता क्लॉज' हे नाव पडले. 6 डिसेंबर 343 मध्ये त्यांचे निधन झाले. परंतु त्यांनी सुरू केलेली माणुसकीची ही परंपरा आजही टिकून आहे.निकोलस यांच्या पत्नीचे नाव क्लॉज होते. त्यांच्या दानशूर वृत्तीमुळेच लोक त्यांना सांता क्लॉज म्हणू लागले.
आज 21 व्या शतकातही तीच परंपरा कायम आहे. 25 डिसेंबरला प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी सांताची ही मायाळू रूपे आपल्याला घराघरांत पाहायला मिळतात. सेंट निकोलस यांचे बालपण अतिशय संघर्षात गेले होते. कदाचित म्हणूनच त्यांना गरिबांचे दुःख कळायचे. त्यांनी स्वतःची ओळख कधीही जाहीर न करता नेहमीच इतरांना मदत केली. लाल रंगाचे कपडे घालून ते रात्रीच्या वेळी गरजू मुलांपर्यंत पोहोचायचे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world