Supreme Court Hearing: सुप्रीम कोर्टात दररोज अनेक याचिका येतात आणि त्यावर सुनावणीही होते. यातील काही याचिकांना अगदी काहीही अर्थ नसतो. अशा प्रकरणात सुप्रीम कोर्ट याचिकाकर्त्यांना फटकारतेही आणि काही वेळा त्यांच्याकडून दंडही आकारते. असेच एक प्रकरण सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आले, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला जोरदार फटकारले आणि त्याची याचिका हास्यास्पद ठरवलीय. इतकेच नव्हे तर "तुम्ही कोणत्या शाळेतून शिक्षण घेतले आहे आणि याचिकेत वापरलेली इंग्रजी भाषा तुम्ही कशी काय लिहू शकता?" असा सवालही कोर्टाने केला.
सुप्रीम कोर्टाचा कडक इशारा
ही याचिका जॅकेट विकणाऱ्या एका व्यापाऱ्याने दाखल केली होती, ज्यामध्ये करात काही सवलती देण्याची मागणी करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, "असे वाटते की याचिकाकर्त्याने ही याचिका अशा कोणाकडून तरी लिहून घेतली आहे, ज्याने एक अस्पष्ट आणि तर्कहीन याचिका तयार केली आहे. या याचिकेचा सूर आणि त्यातील कथित घटनात्मक तत्त्व पाहता ही एका छोट्या व्यापाऱ्याच्या बुद्धीतून आली असावी असे वाटत नाही. आम्ही सध्या कोणत्याही चौकशीचे आदेश देत नाही आहोत, पण भविष्यात अशा याचिका दाखल करू नका, असा कडक इशारा देत आहोत."
(नक्की वाचा: UPSC Result 2026 : दोघींनी पेढे वाटले, दोघींचे सत्कार झाले; पण खरी अधिकारी एकच! निकालातील धक्कादायक सत्य उघड)
सरन्यायाधीशांनी कोर्टातच परीक्षा घेण्याचे दिले आव्हान
CJI सूर्यकांत: ही याचिका तुम्ही स्वतः लिहिली आहे का?
याचिकाकर्ता: हो, मी स्वतः लिहिली आहे. मी माझा फोन येथे जमा करू शकतो.
CJI सूर्यकांत: तुमचे शिक्षण किती झाले आहे?
याचिकाकर्ता: 12वी पास.
CJI सूर्यकांत: कोणत्या शाळेतून?
याचिकाकर्ता: सनातन धर्म स्कूल, लुधियाना.
CJI सूर्यकांत: मी इथे कोर्टातच तुमची एक इंग्रजीची परीक्षा घेईन... जर तुम्ही त्यात 30 मार्क मिळवले, तरच मी ही याचिका पाहीन.
याचिकाकर्ता: हो-हो, मी परीक्षा देऊ शकतो.
CJI सूर्यकांत: एकतर खरे सांगून टाका, अन्यथा आम्ही तुमच्यावर मोठा दंड आकारू आणि चौकशीचे आदेश देऊ.
याचिकाकर्ता: तुम्ही माझा फोन तपासू शकता.
CJI सूर्यकांत: तुम्ही यात 'कॉर्पोरेट डोनर्सना फिड्युशिअरी रिस्क' (fiduciary risk to corporate donors) सारख्या गोष्टी लिहिल्या आहेत... याचा अर्थ काय आहे?
वकील: मी याचिकेचा संदर्भ देऊ शकतो.
CJI सूर्यकांत: मी शेवटचं विचारतोय की हे कोणत्या वकिलाने लिहिले आहे? हे तुम्ही तयार केलेले नाही.
वकील: मी AI टूल्सची मदत घेतली आहे. मी एका टायपिस्टला 4 जॅकेटही भेट दिले होते... आणि त्याने टायपिंगसाठी 1 हजार रुपये प्रति तास घेतले... दास सरांनी.
CJI सूर्यकांत: सुप्रीम कोर्टाच्या टायपिस्टने ही याचिका बनवली आहे? त्या टायपिस्टला इथे बोलवा.
CJI सूर्यकांत: जा, आणखी काही स्वेटर बनवा आणि विका. हे असले उद्योग कराल तर मोठा दंड भरावा लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world