Dharmendra Pradhan resigns : नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ३५ दिवसांनंतर अखेर यश आलं आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी ट्वीट करीत राजीनाम्याचं एक पत्र शेअर केलं आहे. भारताची युवाशक्ती हीच या देशाची खरी ताकद आहे. मी देशाच्या युवाशक्तीला कोणत्याही दुष्टचक्रात अडकू देणार नाही. हा माझा निर्धार आहे, अशा आशायचं पत्र त्यांनी सोशल मीडियावर शेयर केलं आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर दिल्ली, मुंबई, पुण्यातील आंदोलक तरुणांनी जल्लोष व्यक्त केला आहे. गेल्या ३५ दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून नीट पेपरफुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. अखेर त्यांच्या या लढ्याला यश आलं आहे.
#WATCH दिल्ली: लोकसभा में विपक्ष के नेता और कांग्रेस सांसद राहुल गांधी ने कहा, "... छात्रों की 3 मांगें हैं और ये ऐसी मांगें हैं जिन पर बातचीत नहीं हो सकती... पहली मांग यह है कि शिक्षा मंत्री जो भ्रष्ट, नाकाबिल और गलत सोच वाले हैं, उन्हें हटाया जाए... प्रधानमंत्री मोदी की कैबिनेट… pic.twitter.com/285d6wXeLh
— ANI_HindiNews (@AHindinews) July 25, 2026
धर्मेंद्र प्रधान यांना दुसरं मंत्रिपद मिळणार?
दरम्यान आज सकाळी पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी वेगळेच संकेत दिले आहेत. नीट पेपरफुटी विरोधात होणाऱ्या आंदोलनाबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले, सध्या सरकारमध्ये धर्मेंद्र प्रधान यांना दुसरं मंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा घेऊन त्यांना दुसरं मंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा मंत्रिमंडळात सुरू आहे. मात्र असं होता कामा नये. धर्मेंद्र प्रधान हे भ्रष्टाचाराचे प्रतीक आहेत. भारतातील तरुण आणि त्यांच्या भवितव्याशी प्रधान खेळले आहेत. त्यामुळे त्यांना सरकारच्या बाहेर करायला हवं, ना की त्यांना पुन्हा कोणतंही मंत्रिपद दिलं जावं.
नक्की वाचा - ब्रेकिंग! शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश
धर्मेंद्र प्रधान यांनी दुपारी २ नंतर राजीनामा दिल्याचं ट्वीट केलं. त्यानंतर आता मोदी यांच्या मंत्रिमंडळात धर्मेंद्र यांना दुसरं मंत्रिपद दिलं जाणार की नाही हे येत्या काळात समोर येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world