जाहिरात

Heart Attack : हृदयद्रावक! दहावीच्या विद्यार्थिनीचा शाळेबाहेरच हार्टअटॅकने मृत्यू

10th student died due to heart attack : शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी श्रीनिधीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. श्रीनिधीसारख्या लहान मुलीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने अनेकांना धक्का बसला.

Heart Attack : हृदयद्रावक! दहावीच्या विद्यार्थिनीचा शाळेबाहेरच हार्टअटॅकने मृत्यू
Teachers and students of the school expressed grief over the death.

दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेबाहेरच हार्टअटॅकने मृत्यू झाला आहे. तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ही घटना घडली. 16 वर्षीय श्रीनिधी शाळेत चालत जात असताना शाळेबाहेर तिला हार्टअटॅक आला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेजवळ गेल्यानंतर श्रीनिधीच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर तिला काहीसं अस्वस्थ वाटू लागलं होतं. मात्र काही कळायच्या आत ती खाली कोसळली. शाळेतील एका शिक्षिकेने तिला पाहिले आणि तिला ताबडतोब रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली त्यांनी तिला सीपीआर देत प्राथमिक उपचार दिले. परंतु तिने प्रतिसाद न दिल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात पाठवले. दुसऱ्या रुग्णालयात श्रीनिधीला हार्टअटॅकने मृत्यू झाल्याचे घोषित केले. 

(नक्की वाचा - CIDCO Lottery 2025: 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' मिळाले, आता पुढे काय? 'या' गोष्टी करणं बंधनकारक)

शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी श्रीनिधीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. श्रीनिधीसारख्या लहान मुलीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने अनेकांना धक्का बसला. श्रीनिधीच्या मृत्यू आधी काही दिवसांपूर्वीच अलिगडच्या सिरौली गावातील सहावीत शिकणार्या मोहित चौधरीचा हार्टअटॅकने मृत्यू झाला होता. गेल्या काही दिवसांनी लहान मुलांना हार्टअटॅक आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 

(नक्की वाचाCrime News: क्राइम ब्रांचचा अधिकारी असल्याचा बनाव, 12 तरुणींवर अत्याचार, 'असा' अडकला लखोबा)

अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे प्राध्यापक एम रब्बानी यांनी सांगितलं की, "मागील दोन वर्षांत हार्टअटॅकने होणाऱ्या मृत्यूंमध्ये 22 टक्के वाढ झाली आहे. जर एखाद्या निरोगी व्यक्तीचा एका तासाच्या आत मृत्यू झाला तर त्याला कार्डिअॅक अरेस्ट म्हणतात. गेल्या 2 वर्षांत हे प्रमाण 22 टक्क्यांनी वाढले आहे. जर एखाद्या मुलाला श्वास घेण्यास त्रास होत असेल आणि छातीत दुखत असेल तर त्याची त्वरित तपासणी करावी," असा सल्लाही प्राध्यापक रब्बानी यांनी दिला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com