
CM Devendra Fadnavis : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशभरात उत्साहात साजरी झाली. शिवजयंतीनिमित्त उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं.
... तर माझं नाव बदला
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले की, आग्य्रातील कोठी (जी आज मीना बाजार या नावाने ओळखली जाते) तिथं छत्रपती शिवाजी महाराजांना बंदी ठेवण्यात आले होते. या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकार ही जमीन अधिग्रहित करणार आहे. याबाबत मी स्वत: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणार आहे.
योगी आदित्यनाथ यांनी मुघल म्युझियमचे रुपांतर छत्रपती शिवाजी महाराज म्युझियममध्ये केलं. शिवाजी महाराज यांना ठेवण्यात आलेल्या कोठडीची जागा आम्हाला द्या आम्ही स्मारक करू. हे स्मारक इतकं भव्य असेल की, ताजमहाल पाहण्यासाठी येतात त्यापेक्षा अधिक लोकं हे स्मारक बघण्यास येतील. तसं झालं नाही तर माझं फडणवीस हे नाव बदलून ठेवा, असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.
( नक्की वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक का मानले जाते? )
शिवाजी महाराज यांचे मावळे जातीसाठी, धर्मासाठी लढायचे. ते कधी थकत नव्हते, वेतनासाठी ते काम करत नव्हते. जिथे औरंगजेबची कबर आहे त्या औरंगाबादच नाव आम्ही छत्रपती संभाजीनगर केलं, औरंगजेब आमचा पूर्वज होऊ शकत नाही, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world