Cockroach Janta Party : सोशल मीडियावर गेल्या तीन ते चार दिवसांपासून कॉकरोज जनता पार्टीची (Cockroach Janta Party) चर्चा आहे. या पक्षाचा नारा आहे सेक्यूलर, सोशलिस्ट, डेमोक्रेटिक आणि लेझी. CJP ने स्वत:ला तरुणांचा, तरुणांसाठी आणि तरुणांनी तयार केलेलं राजकीय व्यासपीठ असल्याचं सांगितलं आहे. या पार्टीने ऑनलाइन सदस्यता अभियानदेखील सुरू केलं आहे. अवघ्या तीन दिवसापूर्वी या पार्टीचा उगम झाला. १७ मे रोजी सीजेपीने इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केलं. या पक्षाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ३.४ मिलियन फॉलोअर्स आहेत.
सोशल मीडियावर हजारो लोक या अकाऊंटला फॉलो करीत आहे. इतकच नाही तर महुआ मोइत्रा आणि कीर्ती आझादसारख्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी मजेत यामध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कॉकरोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी यापूर्वी आम आदमी पक्षासोबतही काम केलं आहे. सीजेपीने स्वत:ला सद्यव्यवस्थेतील निराश लोकांचा आवाज असल्याचं सांगितलं आहे. अवघ्या चार दिवसात या पक्षाच्या इन्स्टाग्रामला ३.४ मिलियन म्हणजेच ३४ लाख लोकांनी फॉलो केलं आहे.
कॉकरोज जनता पार्टी काय आहे?
भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या कथित वक्तव्यानंतर या पार्टीचा उगम झाल्याचं सांगितलं जात आहे. मुख्य न्यायधीश सूर्यकांत म्हणाले होते की, काही तरुण कॉकरोजसारखे असतात. ज्यांना रोजगार मिळत नाही. ते मीडिया, सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करायला लागतात. मात्र कालांतरही सीजेआय यांनी या प्रकरणात स्पष्टीकरण दिलं आणि त्यांचं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आल्याचं सांगितलं. यावर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी व्यंग्यात्मक प्रतिक्रिया देत म्हटलं, कॉकरोज जनता पार्टीच्या संस्थापकाच्या नात्याने मी या स्पष्टीकरणाचा निषेध व्यक्त करतो. पार्टीने स्वत:चा AI जनरेटेड गीतदेखील जारी केलं आहे. We are Cockroach Party, we are children of a burning city' सीजेपीने आता आपल्या वर्च्युअल 'Gen-Z Convention' आयोजित करण्याची योजना केली आहे.
कॉकरोज... पक्षात सामील होण्याची पात्रता
या पक्षात सामील होण्याचे पात्रता निकषही वेगळे आहेत. तुम्ही बेरोजगार आणि आळशी असणे आवश्यक आहे. जर तुम्ही किमान ११ तास ऑनलाइन घालवू शकत असाल, तर हा पक्ष तुम्हाला सदस्य म्हणून स्वीकारेल. सध्या या पक्षाला टीएमसी खासदार मोईना मित्रा आणि कीर्ती आझाद यांसारख्या प्रमुख राजकारण्यांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यांनी आधीच याचे अनुकरण केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world