संपूर्ण भारतासाठी 15 जानेवारीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजचा दिवस महत्त्वाचा का आहे हे सांगितले आहे. 15 जानेवारी 2025 रोजी नौदलाच्या ताफ्यात युद्धनौका आणि पाणबुडीचा समावेश केला जाणार आहे.
नक्की वाचा :3 बाहुबली युद्धनौकांमुळे भारताचे सागरी सामर्थ्य वाढणार; काय आहे खासियत?
सुरत, निलगिरी या युद्धनौका आणि वागशीर या पाणबुडीचा नौदलात समावेश केला जाणार आहे. मुंबईतील माझगांव डॉकमध्ये या तीनही युद्धनौकांची निर्मिती करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर या निमित्ताने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आपल्या नौदलाच्या क्षमतेच्या दृष्टीने उद्याचा 15 जानेवारी हा विशेष दिवस असणार आहे. तीन प्रमुख युद्धनौकांच्या समावेशामुळे संरक्षण क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याच्या आपल्या प्रयत्नांना बळ मिळेल आणि स्वयंपूर्णतेच्या दिशेने आपल्या प्रयत्नांना चालना मिळेल.”