संपूर्ण भारतासाठी 15 जानेवारीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजचा दिवस महत्त्वाचा का आहे हे सांगितले आहे. 15 जानेवारी 2025 रोजी नौदलाच्या ताफ्यात युद्धनौका आणि पाणबुडीचा समावेश केला जाणार आहे.
नक्की वाचा :3 बाहुबली युद्धनौकांमुळे भारताचे सागरी सामर्थ्य वाढणार; काय आहे खासियत?
सुरत, निलगिरी या युद्धनौका आणि वागशीर या पाणबुडीचा नौदलात समावेश केला जाणार आहे. मुंबईतील माझगांव डॉकमध्ये या तीनही युद्धनौकांची निर्मिती करण्यात आली आहे.
Tomorrow, 15th January, is going to be a special day as far as our naval capacities are concerned. The commissioning of three frontline naval combatants will strengthen our efforts towards being a global leader in defence and augment our quest towards self-reliance. https://t.co/zhrVjbgA2T
— Narendra Modi (@narendramodi) January 14, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर या निमित्ताने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आपल्या नौदलाच्या क्षमतेच्या दृष्टीने उद्याचा 15 जानेवारी हा विशेष दिवस असणार आहे. तीन प्रमुख युद्धनौकांच्या समावेशामुळे संरक्षण क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याच्या आपल्या प्रयत्नांना बळ मिळेल आणि स्वयंपूर्णतेच्या दिशेने आपल्या प्रयत्नांना चालना मिळेल.”
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निलगिरी ही युद्धनौका प्रोजेक्ट 17A अंतर्गत बांधणी करण्यात आलेली स्टेल्थ फ्रिगेट आहे. स्टेल्थ फ्रिगेट ही युद्धनौका विनाशक युद्धनौकेपेक्षा आकाराने थोडी लहान असते.या युद्धनौकेचा वापर मोहिनेसाठी मदत करण्यासाठी, पाणबुडीविरोधी कारवायांसाठी, सागरी सुरक्षेसाठी प्रामुख्याने केला जातो. सुरत ही प्रोजेक्ट 15B अंतर्गत बनविण्यात आलेली चौथी आणि अंतिम युद्धनौका आहे. तर वाघशीर, ही स्कॉर्पिन-श्रेणी प्रकल्पातील सहावी आणि अंतिम पाणबुडी आहे. स्टेल्थ युद्धनौका या शत्रूच्या रडारवर पकटन पकडल्या जाऊ शकत नाही.
संपूर्ण भारतीय बनावटीच्या युद्धनौका
आजचा दिवस महत्त्वाचा यासाठी आहे कारण या युद्धनौका भारतीय नौदलासाठी बांधण्यात आलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या युद्धनौका आहेत. या युद्धनौकांमुळे भारतीय नौदलाची क्षमता आणखी वाढणार आहे. या युद्धनौका आणि पाणबुड्यांच्या आरेखनापासून बांधणीपर्यंतचे सगळे काम भारतात करण्यात आले आहे. या नौका, पाणबुड्यांची बांधणी मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड (MDL) येथे करण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या या नौका नौदलात समाविष्ट केल्या जात असल्याने भारताचे या क्षेत्रातील सामर्थ्य जगाला कळण्यास मदत होणार आहे.
वागशीर, ही कलवरी-श्रेणीतील पाणबुडी असून, प्रोजेक्ट 75 अंतर्गत बांधण्यात आलेली स्कॉर्पीन-श्रेणीची पाणबुडी आहे. डिझेल आणि इलेक्ट्रिक यावर ही पाणबुडी धावते. ही पाणबुडी फार आवाज करत नाही, त्यामुळे तिचा सुगावा पटकन लागत नाही. खोल पाण्यातील युद्धप्रसंग, पाणबुड्यांविरोधातील मोहिमा, गुप्त माहिती गोळा करण्यासाठी, टेहळणी करण्यासाठी आणि विशेष मोहिमांमध्ये भाग घेण्यासाठी ही पाणबुडी सज्ज आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world