Navratri 2025 : गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील देहगाम तालुक्यातील बहियाल गावात नवरात्रीच्या गरब्यादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. दोन गटांमध्ये झालेल्या या वादाचे रूपांतर दंगल आणि हिंसाचारात झाले. यामध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ झाली तर अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रीच्या गरब्यावेळी काही तरुण वारंवार स्कूटर घेऊन गरबा सुरू असलेल्या ठिकाणी फेऱ्या मारत होते. त्याचवेळी एका व्यक्तीने 'आय लव्ह मोहम्मद' असे ओरडल्यामुळे वाद सुरू झाला. या शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर नंतर दगडफेक आणि जाळपोळीत झाल्याचे समोर आले आहे.
(नक्की वाचा- Delhi Crime: 'माझ्यासोबत चल, विदेशात घेऊन जातो'; दिल्लीतील ढोंगी बाबाचा WhatsApp Chat उघड, 17 मुलींसोबत...)
या घटनेत काही कार आणि स्कूटर्सची जाळपोळ झाली असून, त्यांच्या काचाही फोडण्यात आल्या आहेत. याशिवाय, दोन दुकानेही आगीत पूर्णपणे जळून खाक झाली आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.